प्रश्न –  माझ्याकडे अ‍ॅण्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा फोन आहे. यावर पुस्तके ऑफलाइन वाचण्यासाठी कोणते अ‍ॅप
आहे का?     -भूषण दळवी
उत्तर- पुस्तके ऑफलाइन वाचण्यासाठी अ‍ॅण्ड्रॉइडवर अनेक अ‍ॅप्सचे पर्याय आहेत. यामध्ये आय रीडर नावाचे एक अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये आपण टेक्स्ट, सीएचएम, पीडीबी, यूएमडी, एचटीएमएल आणि फोटो फाइल असे फॉरमॅट वाचता येणार आहे. हे अ‍ॅप टीटीएफ फॉण्टही सपोर्ट करते. यामुळे आपल्याला पुस्तकांच्या सॉफ्ट कॉपीही वाचता येऊ शकतात. या अ‍ॅपमध्ये रात्रीच्या वाचनासाठी वेगळे लाइट्स तर दिवसाच्या वाचनासाठी वेगळे लाइट्स उपलब्ध होतात. यात पाने उलटताना एक छानसा आवाजही येतो.
प्रश्न  माझा पेन ड्राइव्ह हा राइट टू प्रोटेक्ट झाला आहे. यावर काय उपाय आहे.      -संजय वानखेडे
उत्तर- काही मेमरी कार्ड किंवा पेन ड्राइव्हमध्ये राइट टू प्रोटेक्ट हा पर्याय असतो. यामुळे तुम्ही तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकता. पण यामुळे पेन ड्राइव्हच्या वापरावर अनेक मर्यादा येतात. यामुळे राइट टू प्रोटेक्ट काढून टाकणे आवश्यक असते. यासाठी काही पद्धती आहेत. यामध्ये एक म्हणजे तुम्ही विण्डोज एक्सपी किंवा त्याच्या वरचे व्हर्जन वापरत असाल तर Regedit.exe चा वापर करून तुम्ही प्रोटेक्शन काढू शकता. यासाठी तुम्ही ComputerHKEY_LOCAL_MACHINEYSTEM मध्ये जा. त्यानंतर CurrentControlSetontroltorageDevicePolicies मध्ये जा. तिथे तुम्हाला राइट टू प्रोटेक्ट नावाची फाइल दिसेल. यावर डबल क्लिक करा. मग तुम्हाला Regedit.exe   ची विण्डो ओपन झालेली दिसेल. यातील व्हॅल्यू डेटामध्ये १ च्या ऐवजी ० करा. मग ओके बटणवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा संगणक रिस्टार्ट करा. आता तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह फॉरमॅट करू शकता. जर तुम्हाला स्टोरेज डिव्हाइस पॉलिसीज नाही मिळाल्या तर ComputerHKEY_LOCAL_MACHINEYSTEM मध्ये राइट क्लिक करा. तिथे तुम्हाला की नावाचा पर्याय दिसेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. मग तुम्ही त्याची व्हॅल्यू बदलू शकता.