भारतीय बाजारात सॅमसंग, सोनी, एलजी आणि नोकीयासारख्या प्रस्थापीत मोबाईल फोन कंपन्यांच्याबरोबरीने तितक्याश्या प्रचलीत नसलेल्या अन्य कंपन्यांचे मोबाईल फोन कमी पैशात अधीक कार्यक्षमता देऊन बाजारात आपले बस्थान बसवू पाहात आहेत. यातच आता भर पडली आहे ती स्वाइपच्या नव्या मोबाईल फोनची, स्वाइपने कनेक्ट शृंखलेतील ‘स्वाइप कनेक्ट ५.०’ हा फॅबलेट बाजारात आणला आहे. ५ इंचाचे टच स्क्रिन आणि वजनाला अतिशय हलका असलेल्या या फोनची किंमत फक्त ८,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. जाणून घेऊया ‘स्वाइप कनेक्ट ५.०’ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये.

आकार आणि वजन
५” च्या या फोनचे डिझाईन हातात सहजपणे मावेल असे करण्यात आले आहे. आकारमानाने जाडीला अतिशय पातळ असा  हा फोन वजनानेदेखील खूप हलका आहे.

डिस्प्ले आणि प्रोसेसर
यात ५” चा फूल एचडी आयपीएस डिस्प्ले पुरविण्यात आला आहे. १.३ गेगाहर्टचा क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आल्याने एकाच वेळी अनेक कामे करताना फोन स्लो अथवा हॅंग होत नाही. १ जीबीचा रॅम असलेला हा फोन अॅण्ड्रॉइड ४.२.२ जेलीबीन प्रणालीवर काम करतो. ही प्रणाली अपग्रेड करून ४.४ किटकॅट अशी करता येऊ शकते.

कॅमेरा आणि मेमरी
फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सल तर पुढील बाजूस 3G व्हिडिओ कॉलिंगसाठी ३.२ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. यातील ‘ओमनीव्हिजन’ सुविधेमुळे कॅमेऱ्याचे रेझोल्युशन अधिक चांगले होऊन छायाचित्रांचा दर्जा सुधारण्यास मदत होते. यात ८ जीबीची इंटरनल मेमरी असून, ती एक्स्टर्नल एसडी कार्डद्वारे ३२ जीबीपर्यंत वाढवता येते.

बॅटरी
हल्ली स्मार्टफोनचा वापर केवळ कॉल करण्यासाठी होत नसून, इंटरनेट सर्फिंग, व्हिडिओ कॉलिंग, छायाचित्र काढणे, व्हिडिओशूट करणे आणि मेल चेक करणे अशा अनेक गोष्टींसाठी वापरला जातो. याची नोंद घेऊन कंपनीने या फोनमध्ये १९५० एमएएचची पॉलिमेरीऑन बॅटरी पुरवली आहे. ज्यामुळे फोन अधिक काळ चालण्यास मदत होते.

कनेक्टिव्हीटी
व्यावसायीक आणि व्यक्तिगत वापरासाठी यात दोन सीम कार्डाची सुविधा देण्यात आली आहे. त्याशिवाय यात वायफाय, 3G, ब्लूट्यूथ सारख्या सुविधादेखील पुरविण्यात आल्या आहेत.

बाजारातील अशाप्रकारच्या इतर फोनच्या तुलनेत ८९९९ रुपये किमतीचा हा फोन म्हणजे प्रिमियम लूक, उत्तम पर्फोमन्स आणि वाजवी दर याचा उत्कृष्ट मिलाफ आहे. याशिवाय या स्मर्टफोन-फॅबलेटबरोबर स्क्रिन गार्ड आणि १४९९ रुपये किमतीचे प्रिमियम बिझनेस नेव्हिगेटर विनाशुल्क देण्यात येत आहे.

थोडक्यात वैशिष्ट्ये-

ऑपरेटिंग सिस्टम – अॅण्ड्रॉइड ४.२.२ जेलीबीन (४.४ किटकॅट अपग्रेडेबल)
डिस्प्ले स्‍क्रीन  – ५” फूल एचडी आयपीएस टच स्क्रिन
प्रोसेसर – १.३ गेगाहर्ट क्वाड कोर
रॅम- १ जीबी रॅम
कॅमेरा – मागील बाजूस ८ मेगापिक्सल, पुढील बाजूस ३.२ मेगापिक्सल
मेमरी – ८ जीबीची अंतर्गत, ३२ जीबी बाह्य
कनेक्टिव्हिटी – (ड्युएल) २ सीम कार्ड, वायफाय, 3G, ब्लूट्यूथ इत्यादी
बॅटरी – १९५० एमएएच पॉलिमेरीऑन
किंमत – रू. ८,९९९
मोफत – स्क्रिन गार्ड आणि १४९९ रुपये किमतीचे प्रिमियम बिझनेस नेव्हिगेटर