एलईडी टीव्ही ऑनलाइन खरेदी करू का?
मला एलईडी टीव्ही खरेदी करावयाचा आहे. त्याची खरेदी ऑनलाइन करू का? मी ऑनलाइन खरेदी कधीच केलेली नाही. प्रथमच करत असल्यामुळे गोंधळल्यासारखे झाले आहे; पण तेथे दर खूप कमी आहेत.
व्हीयू, एओसी आणि मायक्रोमॅक्स यापकी कोणता ब्रँड चांगला आहे? – धनराज काळे
उत्तर – ऑनलाइन खरेदी करण्यास काहीच हरकत नाही; पण ही खरेदी करत असताना आपण ज्या वेळेस एखादे उत्पादन ऑनलाइन पाहतो त्या वेळेस त्याचे फोटो वगैरे पाहतो; पण त्याचबरोबर बाजूला दिलेल्या माहितीमध्ये उत्पादनाची वॉरंटी किंवा गॅरंटीही पाहावी. तसेच आपल्या घराजवळ कंपनीचे सेवा केंद्र आहे का हेही तपासावे. यानंतर ऑनलाइन खरेदी करण्यास हरकत नाही. तुम्ही विचारलेल्या ब्रँडपकी कोणत्याही कंपनीचे टीव्ही हे मुख्य उत्पादन नाही. त्यातले त्यात एओसी या कंपनीला संगणकाचे मॉनिटर्स बनविण्याचा अनुभव आहे. यामुळे या कंपनीचे टीव्हीही चांगले आहेत.

मेमरी कार्डमधून डिलिट झालेले फोटो कसे रिकव्हर करायचे?
प्रकाश कुलकर्णी
उत्तर -डिजिटल कॅमेरा असो किंवा फोन, एक चुकीचे बटण दाबले गेले, की तुमची माहिती डिलिट होते; पण ही माहिती रिकव्हर करण्याची सोयही उपलब्ध आहे. मेमरी कार्डमधील डिलिट झालेले फोटो रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम ते कार्ड कार्डरीडरच्या साहाय्याने संगणकाला कनेक्ट करा. कार्ड कनेक्ट झाले की, http://www.cardrecovery.com/download.asp कार्ड रिकव्हरीसाठी उपलब्ध असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डमधील डिलिट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आणि त्याच्या मदतीला माहिती पुन्हा रिकव्हर करून दिली जाते; पण यासाठी तुम्हाला पसे मोजावे लागतात.

या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.