मोबाइलमध्ये गाण्याचे मिक्सिंग करता येणारे कोणते अ‍ॅप्स आहेत काय? असतील तर ते अ‍ॅप्स सुचवा ?- जयेश वानखेडे
उत्तर – मोबाइलमध्ये गाण्यांचे मिक्सिंग करता येणारे किमान दाहा अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च केले तर यातील अनेक पर्याय तुमच्या समोर येतील. यामध्ये म्युझिक मिक्सर, मिक्स, म्युझिक मिक्सर एचडी, डी जे म्युझिक मिक्सर अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे. अ‍ॅपल आयटय़ून्सवरही काही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यात एडजिंग, डीजे मिक्सर ३ अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे.

मोटो ई किंवा मायक्रोमॅक्स युनिटी २ यापैकी कोणता फोन चांगला आहे ?
– मयुर सावंत
उत्तर – मोटो ई आणि मायक्रोमॅक्स युनिटी२ हे दोन्ही फोन काही बाबतीत समान पातळीवरच आहे. मायक्रोमॅक्स मोबाइल हा हार्डवेअर आणि काही बाबतीत मोटो ईपेक्षा सरस ठरतो. मात्र मोटो ईमधील पाणी लागल्यावरही काही न होणे आणि काही सॉफ्टवेअरच्या बाबतीत सरस ठरतो. यामुळे दोन्ही फोन ज्या किंमतीत उपलब्ध आहेत त्या किंमतीत ते उत्तम पर्याय आहे. यातील बेस्ट कोणता हे जर तुम्हाला निवडायचा असेल तर थोडा भविष्याचा विचार करता ही निवड करणे योग्य ठरेल. म्हणजे मोटोरोला आणि मायक्रोमॅक्स या दोन्ही पैकी मायक्रोमॅक्सचे सेवा केंद्र भारतात बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत. याचबरोबर मोटो ई हा फोन तुम्हाला इंटरनेटवरूनच खरेदी करावा लागेल. तो भारतीय किरकोळ बाजारपेठेत उपलब्ध नाहीए.

माझ्या हार्डडिस्कमधील फोल्डर ओपन होत नाहीए. त्यामध्ये फोटो आणि व्हिडोओज आहे. त्यातील माहिती रिकव्हर करण्यसाठी काय करावे लागेल ?
– अशोक वरेरा
उत्तर – फोर्ल्डर असलेली हार्ड डिस्क संगणकातील आहे की एक्स्टर्नल आहे हे तुम्ही प्रश्नात नमूद केले नाही. यामुळे उत्तर देताना काही मर्यादा येतात. फोल्डर शोधण्यासाठी तुम्ही फोल्डर रिकव्हरी सॉफ्टेवअरचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही तुमची हार्डडिस्क स्कॅन करायला लावली की तुम्हाला त्यातील फोल्डरमधील माहिती परत मिळू शकते. जर तुमची हार्डडिस्क एक्स्टर्नल असेल तरीही तुम्ही या पर्यायाचा स्वीकार करू शकता.