प्रश्न – मेमरी कार्डमधून डिलीट झालेले फोटो कसे रिकव्हर करायचे.     – प्रसाद सोनावणे
उत्तर – डिजिटल कॅमेरा असो किंवा फोन एक चुकीचे बटण दाबले गेले की तुमची माहिती डिलीट होते, पण ही माहिती रिकव्हर करण्याची सोयही उपलब्ध आहे. मेमरी कार्डमधील डिलिट झोलेले फोटो रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम ते कार्ड कार्डरीडरच्या साहाय्याने संगणकाला कनेक्ट करा. कार्ड कनेक्ट झाले की, http://www.cardrecovery.com/download.asp कार्ड रिकव्हरीसाठी उपलब्ध असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डमधील डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आणि त्याच्या मदतीने माहिती पुन्हा रिकव्हर करून दिला जातो, पण यासाठी तुम्हाला पसे मोजावे लागतात.
प्रश्न – माझ्याकडे मायक्रोमॅक्स फन ए ६३ हा फोन आहे. या फोनमध्ये मेसेज टाइप करीत असताना मला व्हायब्रेशन झालेले हवे आहे. यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण ते होत नाही. ते कसे करता येईल.     – सुशांत जाधव
उत्तर – सर्वात प्रथम मोबाइलचे होम बटण दाबा. यानंतर सेटिंगमध्ये जा. तेथे ‘लँग्वेज अ‍ॅण्ड कीबोर्ड’ आणि ‘टच इनपुट’ असे पर्याय असतील. यातील ‘टच इनपुट’मधील ‘टेक्स्ट इनपुट’ हा पर्याय निवडा. यात ‘व्हायब्रेट व्हेन टायिपग’ या पर्यायासमोर  ‘ऑन’ हा पर्याय स्वीकारा. यानंतर तुम्हाला मेसेज टायिपग करताना व्हायब्रेशन सुरू होईल. –

पॅनासॉनिकचे ‘मल्टिटच डिस्प्ले’
भारतीय बाजारपेठेतील नवनवीन तंत्रज्ञान उपकरणांच्या वाढत्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर पॅनासॉनिक कंपनीने शाळा किंवा कंपन्यांमध्ये सादरीकरण आणि प्रशिक्षणासाठी वापरता येऊ शकणारे ‘मल्टिटच एलईडी डिस्प्ले’ दाखल केले आहेत. ८०, ६५ आणि ५० इंच आकाराचे हे ‘एलएफबी७०’ श्रेणीतील डिस्प्ले १ जुलैपासून बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, बोर्ड रूम मीटिंग, प्रशिक्षणात्मक उपक्रम याकरिता उपयोगी ठरणारे हे डिस्प्ले टचस्क्रीन तंत्रज्ञानावर आधारित असून यामध्ये ‘व्हाइटबोर्ड’ सॉफ्टवेअर पुरवण्यात आले आहे. त्यामुळे कम्प्युटरशी कनेक्ट न करता या डिस्प्लेवरून सादरीकरण करता येते. पीडीएफ, पॉवरपॉइंट यांसारख्या प्रोगॅ्रमवर आधारित डॉक्युमेंट हाताळू शकणारे हे डिस्प्ले नोट्स काढण्यासाठीही उपयुक्त आहेत. यामध्ये एका वेळी १०० पेजेसचे सादरीकरण सेव्ह करण्याची सुविधा असून पेनड्राइव्हच्या साह्य़ाने ते ट्रान्स्फरही करता येतात.

‘आयआरसीटीसी’ पाचपट वेगवान
भारतीय रेल्वेतील तिकीट आरक्षणासाठी असलेले ‘आयआरसीटीसी’चे अधिकृत संकेतस्थळ आता पाचपट वेगवान झाले आहे. रेल्वे तिकिटाचे ऑनलाइन बुकिंग करताना होणारा विलंब आणि साइट हँग होण्याचे प्रकार हे टाळण्यासाठी ‘आयआरसीटीसी’ने ६९ कोटी रुपये खर्च करून आपली वेबसाइट ‘नेक्स्ट जनरेशन’ केली आहे. आयआरसीटीसीच्या जुन्या वेबसाइटवर एका मिनिटात दोन हजारपेक्षा अधिक आरक्षणे होऊ शकत नव्हती. तर एकाच वेळी ४० हजारांहून अधिक लोकांना लॉगइनही करता येत नव्हते. मात्र आता ही वेबसाइट अधिक वेगवान करण्यात आली असून त्याद्वारे एका मिनिटात सात हजार तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे. आयआरसीटीसीने आपल्या सर्व नोंदणीकृत ग्राहकांना याबाबत ई मेल अथवा एसएमएसने सूचनाही दिली आहे. आयआरसीटीसीच्या नव्या साइटचा पत्ता:  https://nget.irctc.co.in/eticketing/loginHome.jsf
या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.