tech04स्पीड मोबाइल या कंपनीने परवडणाऱ्या दरात एस ५० हा मोबाइल आणला आहे. या मोबाइलमधील अनेक फीचर्स हे महागडय़ा फोन्सच्या तोडीस तोड आहे. या फोनमध्ये गेस्चर सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. यामुळे फोनचा टच कमालीचा जलद होतो. या फोनची जाडी ७.६ एमएम आहे, तर स्क्रीन पाच इंचांचा आहे. यामुळे फोनवर व्हिडीओ पाहणे सुसह्य़ होते, असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये १.३ गिगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये अँड्रॉइडचे ताजे ४.४.२ हे व्हर्जन देण्यात आले आहे. यामध्ये एक जीबी रॅम देण्यात आली असून आठ जीबीअंतर्गत मेमरी असून ही मेमरी एसडीकार्डच्या साह्य़ाने आपण ३२ जीबीने वाढवू शकतो. फोनमध्ये १७५० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून त्याला एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आला आहे, तर फंट्र कॅमेरा दोन मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ८५०० रुपये असली तरी सुरुवातीला हा फोन ७९०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय याच्यासोबत फ्लॅट केबल इअरफोन आणि ६०० रुपयांचे फ्लॅप कव्हर मोफत देण्यात आले आहे. ..

असरची लिक्विड मालिका
 tech03 असर या लॅपटॉपमधील ब्रँडने मोबाइल क्षेत्रात पाय ठेवून अनेक चांगले मोबाइल्स बाजारात आणले. या कंपनीने आपल्या लिक्विड मालिकेतील दोन फोन्स स्नॅपडील या संकेतस्थळाच्या माध्यमातून बाजारात आणले आहेत. यामध्ये असर लिक्विड जाडे आणि लिक्विड ई-७०० या दोन फोन्सचा समावेश आहे. लिक्विड जाडे या फोनमध्ये गोरीला ग्लास ३ डिस्प्ले देण्यात आला आहे, तर फोनला पाच इंचांची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. याचबरोबर यामध्ये ‘शून्य हवा’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे स्क्रीनचा व्ह्य़ू अधिक ब्राइट दिसतो. यात ४.४ अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या फोनला क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला असून दोन जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनची अंतर्गत मेमरी १६ जीबी आहे. ही मेमरी आपण कार्डच्या साह्य़ाने वाढवूही शकतो. यात मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे, तर हा कॅमेरा अवघ्या ०.३ सेकंदांमध्ये फोकस ठरवतो. यामुळे फोटो काढण्याचा वेळ वाचतो. फोन डय़ुएल सिम आहे. याची स्नॅपडील या ई-संकेतस्थळावरील किंमत १६,९९९ इतकी आहे.
याच कंपनीने बाजारात आणलेल्या ई-७०० या फोनमध्ये तीन सिम कार्डची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे फोन वापरणाऱ्याला सतत नेटवर्क मिळण्याची सुविधा मिळणार आहे. या फोनमध्येही स्क्रीनसाठी ‘शून्य हवा’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे स्क्रीनचा व्ह्य़ू अधिक ब्राइट दिसतो. याची बॅटरी क्षमता ३५०० एमएएच इतकी असल्यामुळे फोनचा पूर्ण वापर केला तरी फोन २४ तासांपर्यंत चार्जिग न करता काम करू शकतो, तर ६० तासांचा या स्टण्डबाय टायमिंग आहे. या फोनचे वजन १५५ ग्रॅम इतके असून तो आपल्या हातात अगदी सहज मावतो. व्हिडीओ पाहणे, गेमिंग आणि वेब ब्राऊझिंगसाठी हा फोन उत्तम आहे. यात क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आला असून २ जीबी रॅम आहे. यातही १६ जीबीअंतर्गत मेमरी देण्यात आली असून मेमरी वाढविण्यासाठी एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉइडची ४.४ ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. या फोनची स्नॅपडील या ई-संकेतस्थळावरील किंमत ११,९९९ इतकी आहे.