प्रश्न – माझ्याकडे सॅमसंग जीटीबी ३४१० हा फोन आहे. यामध्ये नेटफ्रंट ३.५ हे डिफॉल्ट ब्राऊजर आहे. मला फ्लॅश ब्राऊजर डाऊनलोड करायचाय. तो कसा डाऊनलोड करु?
– सुरेश ताम्हाणे
उत्तर – तुमच्या मोबाइलमधला हा ब्राऊजर तुम्हाला अपग्रेड करता येणार नाही. जरी केलात तरीही मोबाइलच्या परफॉर्मन्सवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तो ब्राऊजर कायम ठेऊन ऑपेरा मिनीचं ६.१ व्हर्जन डाऊनलोड करू शकता. मोबाइलवरूनच ऑपेरा मिनी ब्राऊजर डाऊनलोडसाठी सर्च केलंत तर तुमच्या मोबाइलसाठी योग्य व्हर्जन मिळू शकेल. ते डाऊनलोड केल्यावर मोबाइलच्या इंटरनेट सेटिंगमध्ये जाऊन हे ब्राऊजर डिफॉल्ट ठेऊ शकता. ऑपेराने खास मोबाइलकरता वेगवेगळे ब्राऊजर्स विकसित केलेत. जे जास्त स्पेस वापरत नाही. ज्यामुळे मोबाइलच्या स्पीडवर ´ारिणाम होत नाही. यासाठी तु¸ही http://m.opera.com/ ही साइट पाहा.