पूर्वी लॅपटॉप की, त्यामध्ये केवळ एचपी, डेल अशीच विचारणा व्हायची मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये आणखी काही कंपन्यांनी नावेही चच्रेत असून त्यात चांगला प्रभाव असलेले नाव म्हणजे तोशिबा. अलीकडे तोशिबाच्या विक्रीमध्ये चांगली वाढ झाल्याचे बाजारपेठेतील आकडेवारीवरून लक्षात येते. कदाचित सचिन तेंडुलकर त्यांचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर झाल्याचा तो परिणाम असावा. म्हणजे त्याही पूर्वीपासून तोशिबाची उत्पादने चांगली होतीच. पण ती लोकांमध्ये चच्रेत नव्हती. सचिनमुळे ते शक्य झाले असावे. तोशिबाच्या उत्पादनांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ होते ते म्हणजे कमी किंमतीत चांगले उत्पादन.
आताही तोशिबाने बाजारपेठेत आणलेल्या एल ७४० या लॅपटॉपच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. हे मॉडेल कंपनीने स्पार्किलग सॅटेलाइट मालिकेमध्ये बाजारपेठेत आणला आहे. त्याचे बाह्य़रूप आकर्षक आहे. पाच पौंड त्याचे वजन असून डिस्प्ले हा तब्बल १४ इंचाचा आणि एचडी आहे. हे विशेष. याचे ट्रॅकपॅड हे मल्टिटच असून सोबत एचडीएमआय पोर्टही देण्यात आला आहे. १.३ मेगापिक्सेलचा वेबकॅमही सोबत आहेच. २.३ गिगाहर्टझ् इंटेल कोअर आय ५ प्रोसेसर हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्याचबरोबर ८ जीबी डीडीआरथ्री मेमरी आणि ६४० जीबी साटा हार्ड ड्राईव्ह याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २४,०००