05 June 2020

News Flash

व्हॉट्सअ‍ॅपची अडचण

माझ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकॉनवरील संदेशांचा आकडा जातच नाही. मी सर्व संदेश वाचले आहेत तरीही एक आकडा कायम राहतो. त्यावर काय उपाय आहे.

| July 21, 2015 07:12 am

१. माझ्या व्हॉट्सअ‍ॅपच्या आयकॉनवरील संदेशांचा आकडा जातच नाही. मी सर्व संदेश वाचले आहेत तरीही एक आकडा कायम राहतो. त्यावर काय उपाय आहे.
– संतोष मिसाळ
उत्तर : अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर ही अडचण येते. तो एक प्रकारचा व्हायरसही असू शकतो. अशा वेळी तुम्ही सर्वप्रथम सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजरमध्ये जा. तेथे व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप निवडून क्लीअर डेटा हा पर्याय निवडा. यानंतर पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. तरीही तुमच्या आयकॉनवर तो आकडा झळकत असेल तर तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन डेव्हलपर ऑप्शन निवडा. तेथे डू नॉट कीप अ‍ॅक्टिव्हिटी या पर्यायासमोर टिक करा. जर तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन उपलब्ध नसेल तर मग तुम्ही हे करू शकणार नाहीत. याशिवाय आणखी एक पर्याय म्हणजे सेटिंग्जमध्ये जाऊन बॅज प्रोव्हायडरचा पर्याय निवडा. त्याचा डेटा क्लीअर केला तरी तुमच्या आयकॉनवरील आकडे जाऊ शकतील. तरीही नाही झाले तर तुम्ही संपूर्ण व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करून ते पुन्हा इन्स्टॉल करावे. याने तुमची अडचण दूर होऊ शकते.
– तंत्रस्वामी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2015 7:12 am

Web Title: whatsapp problems
टॅग Tech It,Whatsapp
Next Stories
1 स्मार्टफोनचा ‘तल्लख मेंदू’
2 चार हजारांत डबल धमाका
3 फोनचा हॉटस्पॉट
Just Now!
X