प्रश्न : माझा मुलगा सहावीत शिकत आहे. त्याच्यासाठी एक डेस्कटॉप घ्यावयाचा आहे. माझे बजेट १५ हजार रुपयांपर्यंत आहे. तर कोणता डेस्कटॉप घ्यावा. तसेच हा डेस्कटॉप मुलगा दहावीत जाईपर्यंत अपग्रेड करायाची गरज भासणार नाही असे कॉन्फिग्रेशन सांगा.
          ल्ल  सविता राऊत
उत्तर – तुम्हाला चांगल्या दर्जाचा डेस्कटॉप घ्यावयाचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे बजेट आणखी तीन हजार रुपयांनी वाढविणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला डेल किंवा लिनोवासारख्या चांगल्या कंपनीचा डेस्कटॉप घेता येईल. डेस्कटॉपची निवड करताना त्यामध्ये वापरण्यात येणारा प्रोसेसर हा किमान इंटेल कोर आय ३-२१०० असावा. जर बजेट वाढणार असेल आय ५ किंवा आय ७चा प्रोसेसर घेतल्यास चांगले. यानंतर त्यामध्ये किमान चार जीबी रॅम असावी. हार्डडिस्क ५०० जीबीपासून पुढे तुम्हाला पाहिजे तितकी घेऊ शकता. मॉनिटरचा स्क्रीन १७ इंचांचा असावा. सोबत वेब कॅमसारख्या काही अॅक्सेसरीज या असाव्यात. डेस्कटॉपमध्ये २००० ग्राफिक कार्ड यामध्ये असायला हवे.
२. मला प्रिंटर आणि स्कॅनर हवा आहे. माझे बजेट पाच हजार रूपयांचे आहे.
            ल्ल दयानंद सुर्वे
उत्तर – तुम्हाला प्रिंटर आणि स्कॅनर एकत्र हवा असेल तर तुमच्या बजेटमध्ये एचपीचा डेस्कजेट एफ ४१८५ हा प्रिंटर आहे. हा पिंट्रर कलर असून यामध्ये तुम्हाला चार कलर आणि सहा कलर वापरता येऊ शकतात. हा प्रिंटर तुम्हाला ४८०० गुणिले १२०० डीपीआयचे रिझोल्युशनची प्रिंटही काढून देऊ शकतो. याशिवाय तुम्हाला सॅमसंग, एप्सॉन या सारखे पर्यायही उपलब्ध आहेत. तुम्हाला केवळ घरगुती वापरासाठी प्रिंटर हवा असेल तर तुम्ही कलर प्रिंटर घेऊ नये कारण त्याला कार्टरेजची किंमत वारंवार मोजावी लागते.
– तंत्रस्वामी