येत्या जुलै महिन्याच्या सुमारास मायक्रोसॉफ्टने यापूर्वीच जाहीर केल्यानुसार विंडोज एक्सपीची मोडित काढण्यास कंपनीतर्फे सुरुवात करण्यात येईल. त्यानंतर कालांतराने हीच वेळ विंडोज ७वरदेखील येईल. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच मायक्रोसॉफ्टने विंडोज ८ बाजारपेठेत आणले आहे. हळुहळू करत हे विंडोज ८ जगाच्या गळी उतरवण्याचा मायक्रोसॉफ्टचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांसोबत करार करत विंडोज ८ ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम असलेली अल्ट्राबुक्स बाजारात आणली आहे. सध्या या मध्ये चर्चा आहे ती, सॅमसंग आणि डेल या दोन विख्यात कंपन्यांनी बाजारात आणलेल्या अल्ट्राबुक्सची. त्यामध्ये निर्णय घेणे सोपे जावे, यासाठी हा तुलनात्मक तक्ता