भारतातील स्मार्टफोन बाजारात चायनीज स्मार्टफोन कंपन्या आपले हातपाय चांगलेच विस्तारताना दिसत आहेत. झेडटीई या तांत्रिक क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने नुबिया झेड ९ मिनी हा स्मार्टफोन अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून दिला आहे. केवळ अॅमेझॉनवर उपलब्ध असणाऱ्या या फोनची किंमत १६,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये असलेल्या निओव्हिजन ५.० एसएलआर तंत्रज्ञानामुळे यातील कॅमेरा अधिक प्रभावीपणे काम करतो. ५ इंचाचा स्क्रिन असलेल्या या फोनला १९२० x १०८० आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. १.५ जीएकझेड ऑक्टा-कोर स्नॅपड्रेगॉन ६१५ प्रोसेसर, २ जीबी रॅम, १६ जीबी स्टोअरेज स्पेस, ड्युअल सिम, ४ जी सपोर्ट ही या फोनची वैशिष्ट्ये आहेत. फोनमध्ये मागीलबाजूस १६ मेगापिक्सल, तर पुढील बाजूस आठ मेगापिक्सल कॅमेरा आहे. यात असलेली ३००० एमएएच लिथिनियम-आयऑन बॅटरी ३० तासाचा टॉकटाईम, तर ६०० तासांचा स्टॅण्डबाय टाईम देत असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
एक युजर केवळ तीन वेळा या फोनची खरेदी अॅमेझॉनवरून करू शकेल. या फोनला चांगला प्रतिसाद मिळाल्यास नुबिया मालिकेतील अन्य फोन भारतीय बाजारात उतरविण्याचा कंपनीचा विचार असून, काही आठवड्यांपूर्वी चायनामध्ये लॉन्च केलेल्या झेड९ या फ्लॅगशिप फोनचादेखील यात समावेश आहे.