अ‍ॅपलची‘हवा’ई क्रांती

अ‍ॅपलचा आयपॅड कितीही गुणाचा असला तरी गेल्या दोन-तीन वर्षांत आलेल्या त्याच्या नव्या व्हर्जन्समध्ये फार काही बदल पाहायला मिळाला नाही.

अ‍ॅपलचा आयपॅड कितीही गुणाचा असला तरी गेल्या दोन-तीन वर्षांत आलेल्या त्याच्या नव्या व्हर्जन्समध्ये फार काही बदल पाहायला मिळाला नाही. प्रत्येक वेळी अधिक स्पष्ट डिस्प्ले, किंचित वेगवान प्रोसेसर आणि किंचित कमी वजन या पलीकडे फार काही ग्राहकांच्या हाती आलं नाही. पण मंगळवारी अ‍ॅपलनं आयपॅड एअर या आयपॅडच्या पाचव्या आवृत्तीच्या रूपाने ग्राहकांची ही तक्रार दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच्या आयपॅडच्या तुलनेत बराच हलका, २० टक्के अधिक पातळ, अधिक बारीक कडा असलेला हा अधिक वेगवान टॅब्लेट अ‍ॅपिलच्या अनुषंगाने क्रांतीच आहे.
सुट्टय़ांचा हंगाम डोळय़ांसमोर ठेवून अ‍ॅपिलने अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये आयपॅडची पाचवी आवृत्ती लाँच केली. वजन एक पाऊंड (४६९ग्रॅम) आणि जाडी ७.५ मिमी असलेला ‘आयपॅड एअर’ म्हणजे अ‍ॅँपलच्या पोतडीतून निघालेली नवी कमाल गोष्ट आहे. हा जगातील सर्वात हलका आणि पातळ टॅब्लेट असल्याचा दावा अ‍ॅगपलने केला आहे. अर्थात असं म्हणता येणार नाही, कारण सोनीचा झ्पेरीया झेड या टॅब्लेटची जाडी फक्त ६.५ मिमी आहे. पण अ‍ॅपलच्या आधीच्या टॅब्लेटच्या तुलनेत हा निष्टिद्धा (१५५)तच हलका, पातळ आणि वेगवान आहे. ४९९ डॉलर किमतीचा हा आयपॅड एअर येत्या एक नोव्हेंबरपासून अमेरिका आणि चीनच्या बाजारात उपलब्ध होईल. भारतात येण्यासाठी या टॅब्लेटला अद्याप काही वेळ लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
भरारी देणार?
अ‍ॅपलनं २०१० मध्ये पहिला आयपॅड सादर केला. त्यानंतर आतापर्यंत आयपॅडच्या चार आवृत्त्या बाजारात आल्या. मात्र, पहिल्या आयपॅडपेक्षा या चारही व्हर्जन्समध्ये फार काही वेगळं नव्हतं. त्यातच अ‍ॅगपलच्या स्पध्रेत असलेल्या कंपन्यांनी वैशिष्टय़पूर्ण आणि तरीही स्वस्त असे टॅब्लेट (अ‍ॅ्मेझॉनचे किंडल आणि सॅमसंगचे नोट) बाजारात आणल्याने आयपॅडची चलती काहीशी कमी झाली आहे. आपल्या आविष्कारपूर्ण आणि नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅलपलनं गेल्या काही वर्षांत बाजाराला थक्क करेल, असं काही दिलेलं नाही. त्यामुळे कंपनीच्या भागधारकांचा विश्वासही काहीसा कमी झाला आहे. (आयपॅड एअर लाँच झाला त्या दिवशीही अ‍ॅगपलचे शेअर्स ०.३ टक्क्यांनी घसरले). या सर्व पाश्र्वभूमीवर आयपॅड एअर अ‍ॅलपलची बाजारातील ‘हवा’ कायम ठेवेल, असा कंपनीचा विश्वास आहे.
तरीही रस्ता कठीण
आतापर्यंत आलेल्या परीक्षणांतून आयपॅड एअर हे अ‍ॅपलसाठी यशस्वी उत्पादन ठरेल, असे मानले जात आहे. मात्र तरीही आयपॅड एअरला आकर्षक आणि अद्यावत टॅब्लेटच्या स्पध्रेला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्याच आठवडय़ात नोकियाने नोकिया लुमिया २५२० (वैशिष्टय़े चौकटीत पाहा) हा आपला पहिलावहिला टॅब्लेट बाजारात आणला. नोकियाच्या स्मार्टफोन श्रेणीतील हँडसेटप्रमाणे आकर्षक आणि मजबूत बांधणीचा हा टॅब्लेट खूप यशस्वी होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. याशिवाय अ‍ॅमेझॉनचा किंडल एचडीएक्स हादेखील आयपॅडच्या शर्यतीत आहे. याशिवाय सॅमसंग, एलजी आणि आसूस या कंपन्यांच्या टॅब्लेटसना बाजारातून मिळणारी पसंतीही आयपॅडसाठी आव्हान आहे. अर्थात अ‍ॅपिलचे लक्ष्य उच्चतम श्रेणीतील बाजारात आपले वर्चस्व अबाधित ठेवणे हेच असल्याने त्या ठिकाणी आयपॅड एअरला टक्कर देणारे टॅब्लेट्स फारच कमी आहे.     
स्मार्टफोन-टॅब्लेटच्या बाजारात कितीही भाऊगर्दी झाली असली तरी ‘अ‍ॅपल’ची जादू ओसरता ओसरत नाही. आयपॅड आणि आयफोनच्या नवनवीन आवृत्त्यांच्या रूपात अ‍ॅगपलनं या बाजारांवर आपलं वर्चस्व कायम राखलं. आयपॅड आणि आयफोनची डोळे झाकून भक्ती करणारे बहुसंख्य असले तरी त्यांच्या नवीन व्हर्जन्समध्ये नवीन काय, असा प्रश्न विचारणारे सजग वापरकत्रे आहेतच. ‘आयपॅड एअर’ हे अ‍ॅपलचे या वापरकर्त्यांना दिलेले उत्तर आहे.

आयपॅड एअरची वैशिष्टय़े        नोकिया लुमिया २५२० वैशिष्टय़े
वजन     :    ४६९  ग्रॅम    वजन     :    ६१५  ग्रॅम
आकार      :    लांबी २४ सेमी, रुंदी १६.९५ सेमी , जाडी ०.७ सेमी    आकार      :     लांबी २६.७ सेमी, रुंदी १६.८० सेमी , जाडी ०.८ सेमी
डिस्प्ले     :    १५३६  ७   २०४८  पिक्सेल्स (९.७ इंच)    डिस्प्ले     :    १०८०  ७  १९२० पिक्सेल्स (१०.१ इंच)
मेमरी     :    एक जीबी रॅम,     मेमरी     :     दोन जीबी रॅम,
इंटर्नल स्टोअरेज     :    १६/३२ /६४/ १२८   जीबीमध्ये उपलब्ध    इंटर्नल स्टोअरेज     :     ३२ जीबी. एक्स्टर्नल : ३२ जीबीपर्यंत
कॅमेरा     :    बॅक ५ मेगा पिक्सेल्स, फ्रंट १.२ मेगा पिक्सेल    कॅमेरा     :     बॅक ६.७ मेगा पिक्सेल्स, फ्रंट २ मेगा पिक्सेल
चिपसेट     :    अ‍ॅपल ए७     चिपसेट     :     स्नॅपड्रॅगन ८००
प्रोसेसर     :    डय़ुअर कोअर १.३  गिगा हट्र्झ.    प्रोसेसर     :    क्वाड कोअर २.२ गिगा हट्र्झ.
रंग     :    राखाडी व चंदेरी    रंग     :     निळा, लाल, पांढरा, काळा

छोटय़ा आयपॅडला ‘दिव्य’दृष्टी
आयपॅडच्या माध्यमातून टॅब्लेटच्या बाजारात सत्ता गाजवणाऱ्या अ‍ॅगपलने गेल्याच वर्षी आयपॅड मिनी लाँच केला होता. आयपॅडची किंमत न परवडणाऱ्या आणि टॅब्लेट हाताळताना होणारी दमछाक दूर करण्यासाठी बाजारात येऊ लागलेल्या मिनी टॅब्लेटच्या बाजारात प्रवेश करणे, हा त्या मागील अ‍ॅगपलचा हेतू होता. मात्र, गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयपॅड मिनीची किंमत (३२९ डॉलर) बाजारातील अन्य कंपन्यांच्या मिनी टॅब्लेटच्या तुलनेत खूपच जास्त होती. त्यामुळे ग्राहकांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. याच पाश्र्वभूमीवर अ‍ॅगपलने मंगळवारी आयपॅड मिनीची दुसरी आवृत्ती लाँच केली. आयपॅड मिनी २ चे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा रेटिना डिस्प्ले आहे. रेटिना डिस्प्लेमुळे या टॅब्लेटवरून अतिशय दर्जेदार आणि स्पष्ट दृश्यांचा अनुभव घेता येतो. याशिवाय आधीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत नव्या ‘मिनी’ रेझोल्युशन दुप्पट (२०४८ ७ १५३६ ) आहे. याशिवाय यामध्येही आयपॅड एअरप्रमाणेच ६४ बिटचा ए७ हा अधिक वेगवान प्रोसेसर आहे. यामध्ये १६जीबीपासून १२८ जीबीपर्यंतच्या इंटर्नल स्टोअरेज असलेले प्रकार उपलब्ध आहेत. मात्र, आधीच्या आयपॅड मिनीप्रमाणेच ‘मिनी २’ची किंमतही ३९९ डॉलर इतकी आहे. त्यामुळे याला कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल.
आयपॅड मिनी २ ची वैशिष्टय़े
वजन     : ३३१ ग्रॅम
आकार      : लांबी २० सेमी, रुंदी १३.४० सेमी ,
        जाडी ०.७ सेमी
डिस्प्ले     : १५३६  ७ २०४८ पिक्सेल्स (७.९ इंच)
मेमरी     : एक जीबी रॅम,
इंटर्नल स्टोअरेज     :    १६ ते १२८ जीबीच्या श्रेणीत
कॅमेरा     : बॅक ५ मेगा पिक्सेल्स,
        फ्रंट १.२ मेगा पिक्सेल
चिपसेट     : अ‍ॅपल ए ७
प्रोसेसर     : डय़ुअल कोअर १.३ गिगा हट्र्झ सायक्लोन
रंग     : राखाडी, चंदेरी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apples macbook air revolution

ताज्या बातम्या