जोशफुल फॉर्च्युन स्क्वेअर

जोश या मोबाइल कंपनीने नुकताच आपला फॉच्र्युन स्क्वेअर नावाचा स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. यामध्ये ‘वन की इंस्टॉल’ची

जोश या मोबाइल कंपनीने नुकताच आपला फॉच्र्युन स्क्वेअर नावाचा स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. यामध्ये ‘वन की इंस्टॉल’ची विशेष सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेमुळे आपल्याला एक बटन दाबले की काही सेकंदाच्या आता आपल्याला पाहिजे ते अ‍ॅप इंस्टॉल करता येऊ शकते. फॉच्र्युन स्क्वेअरमध्ये प्ले स्टोअर हे इनबिल्ट देण्यात आले आहे. यामुळे आपल्याला प्ले स्टोअरचा पर्याय एका क्लिकवर मिळतो. या फोनमध्ये एक गीगाहार्टझचा प्रोसेसर असून यामध्ये अँड्ऱॉइड २.३.५ ओएस आहे. याचा स्क्रीन ३.५ इंचांचा असून त्याचे रिझोल्यूशन ३२०*४८० इतके आहे. याची किंमत २९९९ इतकी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Enthusiastic josh introduces fortune square

ताज्या बातम्या