scorecardresearch

खराखुरा ‘होमथिएटर’

थ्रीडी टीव्हीचं आकर्षण बाजारात अजूनही कायम असताना टीव्ही कंपन्यांनी आता ४००० पिक्सेल इतकं रेसोल्युशन असलेल्या अल्ट्रा एचडी टीव्हींकडे आपला मोर्चा वळवला

खराखुरा ‘होमथिएटर’

थ्रीडी टीव्हीचं आकर्षण बाजारात अजूनही कायम असताना टीव्ही कंपन्यांनी आता ४००० पिक्सेल इतकं रेसोल्युशन असलेल्या अल्ट्रा एचडी टीव्हींकडे आपला मोर्चा वळवला आहे. सर्वसामान्य एचडी टीव्हीच्या चौपट स्पष्ट आणि प्रभावी चित्र दाखवणारया अल्ट्रा एचडी टीव्हीला आता बाजारात मागणी येऊ लागली आहे. पण एलजीने ‘सीईएस’मध्ये सादर केलेला १०५ इंचांचा अल्ट्रा एचडी एलसीडी टीव्ही म्हणजे अप्रूपच आहे. याच प्रदर्शनात सॅमसंगने ११० इंचाचा टीव्ही मांडला आहे, हे विशेष. पण एलजीच्या 4के टीव्हीची बातच और आहे. सिनेमागृहातील पडद्यावरील्१ चित्रासारखी अनुभूती देणारा हा टीव्ही बसवण्यासाठी सिनेमागृहाइतकाच मोठा हॉल असावा लागेल. पण मोठमोठय़ा आकारातील फ्लॅट टीव्हींची वाढती क्रेझ पाहता, ६९,९९९ डॉलरच्या या टीव्हीला ग्राहक मिळेल, यात शंका नाही.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2014 at 06:31 IST

संबंधित बातम्या