अ‍ॅपल कंपनीने जे टॅबलेट सादर केले ते उत्तम गुणवत्तेचे होते यात शंका नाही. अतिशय संवेदनशील टचस्क्रीन, अतिशय ठळक छायाचित्रे, विविध रंग अशी त्याची वैशिष्टय़े आहेत. त्यांच्यात तीस हजार अ‍ॅप्सची सुविधाही असल्याने त्यांची उपयुक्तताही वाढली आहे. आयपॅडमधील फोर्थ जनरेशन आयपॅडमध्ये रेटिना डिस्प्ले सुविधा असल्याने त्यावर चित्रपट पाहणे किंवा पुस्तके वाचणे याचा अनुभव आल्हाददायक आहे.
* उच्च क्षमतेची बॅटरी (११ तास व्हिडिओ करण्याची सुविधा)
* कॉलिंग सुविधा मात्र नाही, त्याच्याशी संबंधित अ‍ॅप्सही नाहीत. व्हॉटस अ‍ॅप व इतर अ‍ॅप्स त्यावर चालत नाहीत.
* एसडी स्लॉट १६ जीबी, ३२ जीबी व ६४ जीबी अंतर्गत मेमरीत विविध क्षमता उपलब्ध.
* वजन तुलनेने जास्त म्हणजे ६५२ ग्रॅम. सतत वापरण्यास तितकासा योग्य नाही.
इतर वैशिष्टय़े
टचस्क्रीन : ९.७ इंच आयपीएस
पिक्सेल  : २०४८ बाय १५३६
सीपीयू : १.४८ गिगॅहर्टझ डय़ुअल कोअर
रॅम : १ जीबी
अंतर्गत मेमरी : ३२ जीबी, ६४ जीबी व १२८ जीबी
मायक्रो एसडी स्लॉट : उपलब्ध नाही
कॅमेरा : मागचा ५ मेगापिक्सेल, पुढचा १.२ मेगापिक्सेल
वायफाय : ब्लूटूथ
बॅटरी : ११५६० मिली अँपीयर-तास
ऑपरेटिंग सिस्टीम : आयओएस ६.१
रेटिना डिस्प्ले : इंचाला २६४ पिक्सेल (रंगबिंदू), त्यामुळे अतिशय स्पष्ट चित्र.
जमेच्या बाजू : स्क्रीन पिक्सेल जास्त असल्याने चित्रपट पाहणे, इंटरनेट ब्राउिजग , गेम्स खेळणे व इ- बुक्स वाचणे यासाठी उपयुक्त
किंमत : रु. ३९००० पासून पुढे