इंटेक्स या भारतीय कंपनीने ओक्टा कोर प्रोसेसर असलेला भारतीय बनावटीचा पहिलावहिला स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन जानेवारी महिन्यात किरकोळ बाजारात दाखल होणार आहे. या फोनमध्ये आपल्याला अ‍ॅण्ड्रॉइड ४.२.२ ऑपरेटिंग सिस्टीम होणार असून यात १६ जीबी किंवा ३२ जीबी इन्टरनल मेमरी असणार आहे. यातील प्रोसेसर हा १.७ गीगाहार्ट ओक्टा प्रोसेसर असणार आहे. क्वाड कोरनंतरचे संशोधन आणि त्याच्या पुढचे पाऊल म्हणून या ओक्टा प्रोसेसरकडे पाहिले जात आहे. यामुळे फोनचा स्पीड अधिक चांगला होईल तसेच आपल्याला कोणतेही अ‍ॅप्लिकेशन सुरू करण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. याची किंमत २० हजार रुपये आहे.