झिओमीचा बहुचर्चित ‘रेडमी नोट’ भारतात फक्त ८,९९९ रूपयांना! 

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत किफायतशीर किंमतीमध्ये अद्ययावत तांत्रिक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेली झिओमी कंपनी भारतात नवीन उत्पादन आणण्याच्या तयारीत आहे.

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत किफायतशीर किंमतीमध्ये अद्ययावत तांत्रिक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेली झिओमी कंपनी भारतात नवीन उत्पादन आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी आलेल्या ‘रेडमी- १एस’ आणि ‘एम आय-३’ या दोन्ही स्मार्टफोन्सना भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसाद redmi-4g1मिळाला होता. त्यानंतर आता भारतीय ग्राहकांसाठी झिओमीने ‘रेडमी नोट’ हा ८,९९९ रूपये  किंमतीचा स्मार्टफोन आणला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी फ्लिपकार्ट या ऑनलाईन संकेतस्थळावर तब्बल ५०,००० ‘रेडमी नोट’ स्मार्टफोन्स विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. फॅबलेट प्रकारात मोडणाऱ्या या स्मार्टफोनची फोर जी आवृत्ती ग्राहकांना ९,९९९ रूपयांत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘रेडमी नोट’ हा आताच्या घडीला भारतीय बाजारपेठेतील सर्वात कमी किंमतीमध्ये फोर जी तंत्रज्ञानाची सुविधा असणारा स्मार्टफोन आहे. एअरटेल कंपनीच्या सहा शहरांतील प्रमुख आस्थापनांमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन पाहता येऊ शकतो. मात्र, फोनच्या खरेदीसाठी ग्राहकांना एअरटेल किंवा फ्लिपकार्ट यांच्या ऑनलाईन संकेतस्थळांवर नोंदणी करावी लागणार आहे.

‘रेडमी नोट’ची (थ्री जी) ठळक वैशिष्ट्ये

* 5.5-inch IPS display 720 x 1280 pixels
* Android 4.3 OS with MIUI
* 5 1.7 GHz MediaTek MT 6592 octa-core
* CPU Mali 450 GPU
* 2GB RAM
* 8GB internal memory expandable up to 32 GB
* 13 MP rear camera
* 5 MP front camera
* Dual-SIM (micro 3G+2G)
* 3200 mAh battery

किंमत: रूपये ८,९९९

‘रेडमी नोट’ची (फोर जी) ठळक वैशिष्ट्ये
* 5.5-inch HD IPS display
* Corning Gorilla Glass 3
* 1.6GHz quad-core Qualcomm Snapdragon 400
* MSM8928 processor
* 2GB RAM, 8GB internal flash memory with external
* microSD slot that supports up to 64GB Single SIM with
* 4G support (Dual band support on both TDD-2300 MHz & FDD-1800 MHz)
* 13MP rear camera with ƒ/2.2 aperture that supports1080p video recording, and a 5MP front camera
* 3100 mAh lithium-polymer battery

किंमत: रूपये ९,९९९

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Xiaomi launches redmi note in india at rs 8999 4g version at rs