15 December 2017

News Flash

स्मार्टफोनची फोर-जी आवृत्ती

फोरजी इंटरनेटच्या एक ना अनेक आकर्षक ऑफर्स डोळय़ासमोर दिसू लागल्या आहेत.

नीरज पंडित | Updated: April 18, 2017 2:33 AM

फोरजी इंटरनेटच्या एक ना अनेक आकर्षक ऑफर्स डोळय़ासमोर दिसू लागल्या आहेत.

फोरजी इंटरनेटच्या एक ना अनेक आकर्षक ऑफर्स डोळय़ासमोर दिसू लागल्या आहेत. टीव्हीवर, रस्त्यावर, वृत्तपत्रांमध्ये सर्वत्र फोरजी इंटरनेटच्या ऑफर्सनी गर्दी केली आहे. पण या ऑफर्स घ्यायच्या म्हणजे तसा फोन आपल्या हातात हवा. यामुळे सध्या बाजारात फोरजीची सुविधा असलेल्या स्मार्टफोनची मागणी वाढू लागली आहे. बाजारातही स्मार्टफोनचे नानाविध पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. पण साधारणत: वीस हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोन्सना ग्राहक सर्वाधिक पसंती देत आहेत. पाहुयात वीस हजार रुपयांपर्यंतचे फोरजी स्मार्टफोनचे पर्याय.

लिनोवो झेड २ प्लस

स्मार्टफोन घेताना भारतीय ग्राहकाला त्यामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा, जास्तीत जास्त मेमरी, रॅम या सर्व सुविधांबरोबरच चांगली बॅटरी, चांगला प्रोसेसर अशा सर्व गोष्टी हव्या असतात. हे सर्व अगदी माफक दरात हवे असते. लिनोवोने बाजारात आणलेला झेड २ प्लस या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८२० ऑनबोर्ड प्रोसेसर देण्यात आला आहे. यामुळे फोन अधिक जलद गतीने काम करतो व इतर फोनच्या तुलनेत या बाबतीत उजवा ठरतो. फोनमध्ये चार जीबी रॅम देण्यात आली आहे तर ६४ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. याचा स्क्रीन १०८० पिक्सेलचा पाच इंचाचा असून त्याची रंगसंगती याचे खासियत आहे. यामध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फिचर्सप्रमाणे बॅटरी क्षमता ३५०० एमएएच इतकी आहे. फोनमध्ये अँड्रॉइड ६.० ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे.

किंमत : अ‍ॅमेझॉन – रुपये १६९८९, फ्लिपकार्ट- १६९३० रुपये

कूलपॅड कूल १

कूलपॅड या कंपनीने नुकतेच बजेट मोबाइलच्या बाजारात पाऊल ठेवले आहे. यापूर्वी या कंपनीचे टॅब आणि मोठय़ा स्क्रीनचे फोन प्रसिद्ध होते. कंपनीचा कूल १ हा फोन म्हणजे ले इको ले २ या फोनची थोडी सुधारित आवृत्ती असे म्हणता येऊ शकते. या फोनचा कॅमेरा आणि फोनची बॅटरी या दोन्ही जमेच्या बाजू ठरल्या आहेत. यामुळे हा फोन मध्यम किमतीच्या फोनमध्ये उजवा ठरतो. या फोनला डय़ुएल कॅमरा प्रणाली आहे. म्हणजे फोनला मागच्या बाजूस १३ मेगापिक्सेल व आठ मेगापिक्सेल असे दोन कॅमेरे आहेत. या दोन्हीच्या साह्याने अधिक चांगले छायाचित्र टिपणे शक्य होते. फोनला ५.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६५२ प्रोसेसर देण्यात आला आहे. चार जीबी रॅम असून 32 जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता आहे. फोनची बॅटरी ४००० एमएएच इतकी आहे. तर फोनमध्ये अँड्रॉइडची 6.0 ही आवृत्ती वापरण्यात आली आहे.

किंमत : अ‍ॅमेझॉन – रुपये १०९९९

ले इको ले मॅम्स २

लिनोवोने झेड२ प्लस हा फोन बाजारात आणला तेव्हापासून अनेक मोबाइल कंपन्यांनी त्यांच्या मोबाइलच्या किमती कमी केल्या आहेत. ले इकोनेही तेच केले. चीनमधील या कंपनीने अल्पावधीत भारतात आपले स्थान बळकट केले. सुरुवातीला टीव्ही असलेला मोबाइल म्हणून याची विशेष ओळख झाली. मात्र नंतर मध्यम किमतीच्या स्मार्टफोन बाजारात ले इको हा ब्रँड चांगलाच प्रस्थापित झाला. कंपनीच्या ले मॅक्स २ या फोनची किंमत २२ हजार ९९९  रुपयांवरून थेट १७ हजार ९९९ रुपयांवर आणली या फोनमध्ये क्वलाकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनला २५६० बाय १४४० पिक्सेलचा ५.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. चार जीबी रॅम देण्यात आली असून ३२ जीबीची अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. फोनला ३१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय हा फोन अँड्रॉइड ६.० या ऑपरेटिंग प्रणालीवर काम करतो.

किंमत : फ्लिपकार्ट – १७९९९ रुपये.

शिओमी मी मॅक्स प्राइम

जर तुम्हाला स्मार्टफोनवर व्हिडीओ पाहायचे असतील आणि तुम्हाला मोठा स्क्रीन वापरणे त्रासाचे होत नसेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. यामध्ये तब्बल १२८ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. या फोनला ६.४४ इंचाचा १९२० गुणिले १०८० पिक्सेल रिझोल्युशन असलेला डिस्प्ले आहे. यामुळे व्हिडीओ पाहण्यासाठी हा फोन अगदी उपयुक्त ठरतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६५० प्रासेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये चार जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनला १६ मेगापिक्सेलचा मुख्य तर पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर फोनमध्ये ४८५० एमएएचची बॅटरी व अँड्रॉइड ६.० ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे.

किंमत : अ‍ॅमेझॉन : रुपये १९९९९

मोटो जी ४ प्लस

मोटोरोलाने नुकत्याच बाजारात आणलेल्या जी मालिकेतील फोनमध्ये उत्तम कॅमेरा फिचर्स देण्यात आले आहेत. अर्थात या फोनची तुलना लिनोवो झूक २ किंवा ले इको ले २ या फोनशी होऊ शकत नाही. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१७ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५.५ इंचाचा पूर्ण एचडी रिझोल्युशन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ३२ जीबी आणि १६ जीबी असा दोन साठवणूक क्षमतेमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तीन जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनची बॅटरी क्षमता ३००० एमएएच इतकी आहे व फोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीची ६.०.१ ही आवृत्ती देण्यात आली आहे.

नीरज पंडित -Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit

First Published on April 18, 2017 2:33 am

Web Title: affordable 4g smartphones available in indian market