वस्तूंवरील क्यूआर कोड किंवा बारकोड वाचण्यासाठी मोबाइलमध्ये कोणते अ‍ॅप आहे का?

संजय राऊत, डोंबिवली

उत्तर – अनेक जाहिरातींत एखादा बारकोड दिला जातो जो स्कॅन केल्यावर तुम्हाला त्या उत्पादनाची माहिती लगेच मिळेल असं म्हटलं जातं. आता प्रश्न हा आहे की, बारकोड म्हणजे नेमकं काय आणि तो स्कॅन कसा करायचा. याचसाठी स्मार्टफोनमध्ये क्यूआर बारकोड अ‍ॅप्लिकेशन आहे. दिलेला बारकोड स्कॅन करून त्याची माहिती काही क्षणांतच हे अ‍ॅप्लिकेशन देतं. नुकताच ब्लॉग्जसाठीही क्यूआर बारकोड सुरू झाला आहे. शॉपिंग करताना प्रॉडक्टवर किंमत दिसत नसेल तरी या अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने त्या वस्तूची किंमत, संपूर्ण माहिती, ते का बनवलंय, त्याची क्वांटिटी, क्वालिटी अशा सगळ्या गोष्टी दिसतात. तुम्ही फसण्याचा धोका कमीत कमी होतो. उदा. पाहायचं असेल तर तुमच्या आधारकार्डावरचा बारकोड स्कॅन करून पाहा. त्यावरची सगळी माहिती दिसेल.

या सदरासाठी प्रश्न stechit@gmail.com वर मेल करा.

तंत्रस्वामी