खरेदीचा उत्सव म्हणून विशेष ओळख असलेल्या दिवाळीत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन उत्पादने बाजारात आणण्याचा हा व्यवसायांचा जुना फंडा. याही वर्षी अनेक नामांकित ब्रँड्सनी दिवाळीचे निमित्त साधून आपली उत्पादने बाजारात आणली आहेत. यामध्ये यंदा नामांकित ब्रँड्ससोबतच भारतीय आणि चिनी ब्रँड्सचाही समावेश प्रकर्षांने दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त भेट देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये बदल झाला असून नेहमीच्या कपडय़ांची जागा आता गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी घेतली आहे. यामुळेही या बाजारात यंदा चांगलीच तेजी आहे. पाहू या ऑक्टोबर महिन्यात ई-बाजारात दिवाळीनिमित्त काय आले आहे आणि काय ऑफर्स देऊ केल्या आहेत.

स्मार्टफोन 

स्मार्टफोन कंपन्यांनी स्मार्ट खेळी करीत ऐन खरेदीच्या हंगामात आपले फोन बाजारात आणले आहेत. यामध्ये अ‍ॅपल आणि गुगल यांचे फोन या कालावधीत बाजारात येणे हे वर्षभरापूर्वीचे नियोजन असले तरी अनेक देशी आणि चिनी कंपन्यांनी संधी साधून आपले नवे फोन बाजारात आणले आहेत.

इंटेक्स

इंटेक्सने अ‍ॅक्वा ५.५ व्हीआर आणि अ‍ॅक्वा क्रेझ-२ हे दोन फोन नुकतेच बाजारात आणले. या दोन्ही फोनमध्ये १.२ गीगाहर्टझचा क्वाडकोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. याचबरोबर एक जीबी रॅम देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये आठ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली असून ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. अ‍ॅक्वा ५.५ व्हीआर हा फोन आभासी जगताला जोडणारा असून यामध्ये बॅटरी क्षमता २८०० एमएएच देण्यात आली आहे, तर अ‍ॅक्वा क्रेझ-२ या फोनमध्ये २५०० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या दोन्ही फोनमध्ये फ्रंट आणि मुख्य कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. तर दोन्ही फोन इंटेक्सच्या विशेष मातृभाषा या सुविधेने अद्ययावत करण्यात आले आहेत. यामुळे या फोनमध्ये भारतीय भाषांचा वापर करता येतो. दोन्ही फोन ४ जीव्हीओएलटीई पूरक असून फोनमध्ये अँड्रॉइड ६.० ही ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. यातील ५.५ व्हीआरची किंमत ५०९९ रुपये असून क्रेझ-२ ची किंमत ५९९० रुपये आहे.

झेन मोबाइल

tech07या कंपनीनेही सिनेमॅक्स फोर्स हा फोन बाजारात आणला आहे. या फोनची स्क्रीन ५.५ इंचाची असून यात १.३२ गीगाहर्टझ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता २९०० एमएएच असून फोनमध्ये आठ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता आहे, तर ती क्षमता ३२ जीबीपी वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये लाइव्ह टीव्हीसाठी विशेष अ‍ॅप्स देण्यात आले आहेत. याची किंमत ४२९० आहे, तर कंपनीच्या नियमांनुसार या फोनचा तुटलेला स्क्रीन एक वेळा केवळ १८० रुपये इतकी मजुरी घेऊन बसवून दिला जाणार आहे.

जिओनी

tech06सेल्फी फोन म्हणून विशेष ओळख असलेल्या जिओनी या कंपनीनेही याच महिन्याच्या सुरुवातीला आभासी विश्वात tech05नेणारा स्टायलिश एस ६ प्रो हा महागडा फोन बाजारात आणला आहे. आभासी जगतात रमविणारा हा फोन बाजारात आणताना त्यासाठी पूरक हार्डवेअरही कंपनीने दिले आहे. या फोनमध्ये ५.५ इंचांचा पूर्ण एचडी स्क्रीन, चार जीबी रॅम तसेच ६४ जीबीची अंतर्गत साठवणूक क्षमता देण्यात आली आहे. तसेच ३१०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून आठ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला डय़ुएल स्क्रीन सुविध देण्यात आली आहे, तर फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे. या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये असून फोनसोबत व्हीआर हेडसेट २,४९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

लॅपटॉप

tec01rस्मार्टफोनच्या भाऊगर्दीमध्ये लेनोव्हो या कंपनीने काही दर्जेदार लॅपटॉप्स बाजारात आणले आहेत. सातव्या पिढीचे इंटेल प्रोसेसर, संपूर्ण एचडी डिस्प्ले, जलदचार्ज, उत्कृष्ट ग्राफिक क्षमता आदी वैशिष्टय़ांनी युक्त अशा लॅपटॉप्सची मालिका लेनोव्होने बाजारात आणली आहे.

आयडियापॅड ७१०एस व ५१०एस-

हा लॅपटॉप वजनाने अगदी हलका असून यामध्ये जलदगती चार्जिग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची किंमत अनुक्रमे रुपये ७३३९० आणि ५१०९० इतकी आहे.

आयपॅड वाय ७००-

हा लॅपटॉप ४३.९ सेंटीमीटरचा असून तो विशेषत: गेमिंगसाठी विकसित करण्यात आला आहे. डेस्कटॉप वर्गातील हा गेमिंग लॅपटॉप असून अप्रतिम चित्र व ध्वनी, क्वाड-कोअर पॉवर, आगळी ग्राफिक व संपूर्ण मल्टिमीडिया ही त्याची वैशिष्टय़े आहेत. १,२८,०९० रुपयांच्या या लॅपटॉपसोबत १९,४९६ रुपये किमतीचा हार्ड बंडल्ड गेमिंग किट ग्राहकांना केवळ २९९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय कंपनीने याच मालिकेतील आणखी पाच लॅपटॉप बाजारात आणले आहेत.

स्मार्ट टीव्ही

tech04स्मार्टफोन, स्मार्टलॅपटॉप आणि त्याच्या जोडीला आता स्मार्टटीव्हीही ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. यामुळे यंदा दिवाळीचे निमित्त साधून सोनी आणि कोडॅक या कंपनीने नुकतेच स्मार्टटीव्ही बाजारात आणले आहेत. सोनीने ब्रेव्हिया केडी ६५ झेड९ हा टीव्ही बाजारात आणला आहे. ही टीव्ही ४ केएचडीआर तंत्रज्ञानावर आधारित आहे. यामुळे यात दिसणारे चित्र हे अधिक स्पष्ट दिसते. या टीव्हीमध्ये अँड्रॉइड ६.० ही ऑपरेटिंग प्रणाली देण्यात आली आहे. यामुळे गुगल प्ले स्टोअरवरील सर्व अ‍ॅप्स आपल्याला या टीव्हीवर वापरता येऊ शकतात. हा टीव्ही ६५ इंचांचा असून तो २० ऑक्टोबरपासून विक्रीस उपलब्ध होणार आहे. याची किंमत ५०४९०० रुपये इतकी आहे, तर स्वस्त कॅमेरा उपलब्ध करून देणाऱ्या कोडॅक या कंपनीने यानिमित्ताने टीव्ही बाजारात उडी घेतली असून त्यांनी एचडी एलईडी टीव्ही बाजारात आणला आहे. या टीव्हीमध्ये बहुतांश हार्डवेअर हे सॅमसंगचे वापरण्यात आले असून यात चार जीबीची फ्लॅश मेमरी देण्यात आली आहे. तसेच यात यूएसबी जोडणी देण्यात आली आहे. हे टीव्ही ३२ इंचांपासून ते ५० इंचांपर्यंत उपलब्ध आहेत. याची किंमत ११,९९९ रुपये असून हे टीव्ही सध्या केवळ शॉपक्लूज या संकेतस्थळावरच उपलब्ध आहेत.

नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com