News Flash

हेडफोनच्या दुनियेत

सध्याच्या युगात नावीन्य आणि वेगळेपणाची अनुभूती देणारे साजेसे असे तंत्रज्ञान दरोरोज बाजारात दाखल होते

हेडफोन्सच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान

सध्याच्या युगात नावीन्य आणि वेगळेपणाची अनुभूती देणारे साजेसे असे तंत्रज्ञान दरोरोज बाजारात दाखल होते. त्यात भारतीय बाजारपेठेत मोबाइल क्षेत्रातील होणारी करोडोंची उलाढाल पाहता त्यातील वेगळेपण कायम ठेवण्यासाठी ‘मेक इन इंडिया’अतंर्गत विविध मोबाइलशी निगडित अ‍ॅक्सेसरीजदेखील येत आहेत. त्यानुसारच एव्हीडसन, टॅग, ऑडिओ टेक्ना आणि फिल या कंपन्यांनी देखील हेडफोन्सच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान बाजारात उतरवून ग्राहकांना नव वर्षांत आकर्षक असा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

एव्हीडसन बी-३ 

‘मेक इन इंडिया’अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एव्हीडसन ऑडिओ या हेडफोन्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीने ईव्हीडसन बी-३ ही नवी श्रेणी बाजारात उतरवलेली आहे. या हेडफोन्समधील नियोडायमियम एचडी अ‍ॅकोस्टीक ड्रायव्हर्समुळे ऐकू येणारा आवाज हा अतिशय सशक्त, सातत्यपूर्ण आणि मनाला प्रसन्नतेची अनुभूती देणारा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर या हेडफोन्समधील उच्च क्षमतेच्या  मायक्रोफोन्समुळे वापरकर्त्यांला येणारे कॉल घेणेदेखील अगदी सोपे झाले आहे. त्याचबरोबर या हेडफोनवरील रिमोट कंट्रोलमुळे सुरू असलेले गाणे गरजेनुसार थांबविणे, स्किप करणे किंवा पुढे ढकलणेदेखील सहज शक्य होणार आहे.

वैशिष्टय़े

* उच्च क्षमतेचा स्पष्ट आवाज

* रिच बास, क्रिप्स मीड्स आणि स्पष्टपणा

* संभाषणासाठी माइकची व्यवस्था

* गाणे आणि आलेला कॉल स्वीकारण्यासाठीची तसेच गाणे थांबविणे किंवा पुन्हा सुरू करण्याऱ्या बटनची सुविधा

* रंग- निळा, लाला आणि काळा.

* किंमत- १२९९/-

‘टॅग’चा ५०० डय़ुएल ड्रायव्हर

भारतातील इलेक्ट्रानिक क्षेत्रातील अग्रमानांकित उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या ‘टॅग’ या कंपनीने त्यांचा साऊंड गेअर ५०० डय़ुएल ड्रायव्हर हेडफोन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.  सहज हाताळण्यायोग्य आणि आकर्षक असे हे हेडफोन असून यातील डय़ुएल ड्रायव्हर ही प्रणाली आवाजातील स्पष्टपणा आणि उच्च क्षमता अधोरेखित करतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातील धकाधकीच्या आयुष्यातही हा हेडफोन ग्राहकाला चांगल्या प्रकारची सेवा देईल, असा कंपनीचा दावा आहे. वजनाने हलके  असलेल्या या हेडफोनचे टिकाऊ तसेच सहजपणे हाताळणे शक्य आहे. त्याचबरोबर इन लाइन मायक्रोफोनमुळे गाण्याचा आवाज कमी करणे किंवा येणाऱ्या संगीताची मनमुराद आनंद देण्याची क्षमता आहे. हे हेडफोन काळ्या आणि सोनेरी रंगांत उपलब्ध असून त्याची किंमत १५९९ रुपये एवढी आहे.

ऑडिओ टेक्नाचा ‘क्वाएट पॉइंट’ 

‘ऑडिओ टेक्ना’ या कंपनीने भारतीय बाजारपेठेत हेडफोनच्या नवी श्रेणी उतरवलेली आहे. यात ब्लूटय़ूथप्रमाणे असलेला वायरलेस एटीएच-एएनसी४०बीटी, उच्च क्षमतेचा एटीएच-एएनसी५०आयएस आणि एटीएच-एएनसी ७० यांचा समावेश आहे. यापैकी एटीएच-एएनसी४०बीटी हा वायरलेस ब्लूटय़ूथ हेडफोन असून आवाजातील स्पष्टपणा आणि उच्च क्षमता हे त्याचे वैशिष्टय़ आहे. यातील १३.५ एमएमचे ड्रायव्हरमुळे येणारा स्पष्ट आवाज आणि यूएसबीच्या साहाय्याने पुन्हा रिचार्जदेखील करता येतो. शिवाय संभाषणासाठी माइकदेखील देण्यात आलेला आहे.

एटीएच-एएनसी५०आयएस हा हेडफोन साधारण

८७ टक्क्यांपर्यंत आवाजातील विस्कळीतपणा दूर करतो. तसेच उच्च क्षमतेच्या इन लाइन मायक्रोफोनची सुविधा आहे, तर ४० एमएमच्या ड्रायव्हरमुळे वापरकर्त्यांला प्रभावी आवाज हे त्याचे वैशिष्टय़ आहे. एटीएच-एएनसी ७० हा हेडफोन आवाजातील ९० टक्के विस्कळीतपणा कमी करतो. यातील ऑडिओ टेक्निका हे बटन दाबल्यानंतर संभाषणासाठीचा माइक कार्यान्वित होतो. त्याचबरोबर आवाजातील कमी-जास्तपणादेखील यामुळे करता येतो. हे हेडफोन्स आयफोन, आयपॅडसाठी देखील वापरता येतात.

फील कंपनीचा वायरलेस हेडफोन 

हेडफोन क्षेत्रातील फील कंपनीने देखील वायरलेस हेडफोन बाजारात उतरवला आहे. टॉप ऑफ द लाइन, ब्लूटय़ूथ प्रणाली आणि आवाजातील विस्कळीतपणा कमी करण्याची उच्च क्षमतेचे हे हेडफोन्स आहेत.

वैशिष्टय़े

* आवाजाची स्पष्टता- ९८ ते ८५ टक्के

* बीट ट्रान्समिशन रेंज- ३३० फुटापर्यंत, जोडणी जास्तीत जास्त ८ आणि एकाच वेळी २

* ३३ तास सातत्याने वापरणे शक्य शिवाय गाणे ऐकत असताना पुन्हा रिचार्ज करणेही शक्य.

* डिजिटल सिग्नल प्रोसेसर प्रणाली

* फ्रिवेन्सी क्षमता- १५एचझे- २२केएचझे

* इंपेडन्स- ३२ओएचएमएस.

* सेन्सिटिव्ह- ११०डीबीएलपीएल/व्ही, १ केएचझे

* रंग- लाल आणि करडा

* किंमत- १७४९९/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:29 am

Web Title: best headphones made in india
Next Stories
1 फेसबुक सांभाळा!
2 अँड्रॉइडची स्मार्ट गुपिते
3 ‘पॉवर’फुल्ल!
Just Now!
X