08 March 2021

News Flash

अॅपची शाळा : खेळातून ज्ञानरंजन

उदाहरणार्थ एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेली वस्तू जसे की, एखादा रिकामा ग्लास तुम्हाला आडवा करायचा आहे.

‘ब्रेन इट ऑन’ (Brain it on) या अ‍ॅपमधे भौतिकशास्त्रावर आधारित धमाल पझल्स आहेत. प्रत्येक पझलमध्ये काही तरी वेगळी कृती करायची आहे. पझल उघडल्यावर स्क्रीनवर आपल्याला त्या पझलमधे नक्की काय करायचे आहे ते सांगितले जाते.

उदाहरणार्थ एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवलेली वस्तू जसे की, एखादा रिकामा ग्लास तुम्हाला आडवा करायचा आहे. किंवा उंचावर असलेल्या एखाद्या सपाट पृष्ठभागावरील तीन चेंडूंपैकी केवळ दोन चेंडू जमिनीवर असलेल्या एका ग्लासामध्ये पाडायचे आहेत. हे करण्यासाठी तुम्ही बोटाच्या साहाय्याने गोल, चौकोन, त्रिकोण, उभी किंवा आडवी, तिरपी रेषा यापैकी कुठलाही आकार एक वस्तू म्हणून काढू शकता. त्या वस्तूचा आकार तुम्हाला हवा तेवढा लहान-मोठा काढू शकता. आकार काढून झाल्यावर तो (न्यूटनच्या सफरचंदाप्रमाणे) वरून खाली पडेल.

आता समजा जमिनीवरील उभा ग्लास आडवा करण्यासाठी कोणत्या आकाराची वस्तू ग्लासावर पडली तर तो ग्लास आडवा पडेल याचा प्रयोग करून बघायचा आहे. वरवर बघता कुठलीही वस्तू त्या ग्लासवर पडली तरी ग्लास आडवा पडेल असे वाटते. परंतु प्रत्यक्षात तसे होतेच असे नाही. मग कुठली वस्तू वापरल्यावर काय होते हे याचे प्रात्यक्षिक तुम्ही येथे बघू शकता. हे तुम्हाला खेळामध्ये मनोरंजक अ‍ॅनिमेशनद्वारे दिसते.

ग्लासच्या कोपऱ्यावर तुम्ही गोल, चौकोन, त्रिकोण यांपैकी एखादा आकार वरून टाकलात तर ग्लास आडवा पडू शकतो. परंतु योग्य अंतरावरून हा आकार सोडला नाही तर आकार एक तर ग्लासमधे पडू शकतो किंवा जमिनीवर. तसेच आपण काढलेला आकार किती लहान-मोठा आहे यावरदेखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. या पझलसाठी कुठलेही एक ठरावीक उत्तर नाही. जी कृती केल्याने त्या पझलमध्ये ठेवलेले लक्ष्य पूर्ण होते ते त्याचे उत्तर. ज्या कृतीमुळे कमीत कमी वेळात पझल पूर्ण झाले ते आदर्श उत्तर म्हणता येईल.

एखाद्या पझलमध्ये एकापेक्षा अधिक आकृत्या काढण्याची आवश्यकता भासू शकते. एखाद्य पझलमध्ये किती आकृत्या लागू शकतात आणि हे पझल किती सेकंदांत पूर्ण करायचे आहे हे पझलसोबतच दाखवले जाते. एखाद्या पझलचे उत्तर मिळत नसल्यास प्रश्नचिन्हावर क्लिक करून हिंटची मदत घेता येते.

इतर सर्व खेळांप्रमाणेच या खेळातही बऱ्याच लेव्हल्स आहेत. या खेळात भौतिकशास्त्राचे म्हणजे खरे तर व्यवहारातील सामान्य ज्ञानाचे नियम वापरले गेले आहेत. वेगवेगळ्या आकारांच्या वस्तू एकमेकांवर आपटल्यावर नेमके काय होते याची कल्पना करून तुम्हाला योग्य त्या कृती करायच्या आहेत.

्रढँल्ली आणि iPad वर https://itunes.apple.com/en/app/brain-it-on!-physics-puzzles/id985367692AGmt=8 ही लिंक वापरून हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

अँड्रॉईडसाठी https://play.google.com/store/apps/detailsAGid=com.orbital.brainiton&hl=en  ही लिंक वापरून हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

या खेळाचा आवाका, त्यातील गंमत किंवा खेळ सुरू करण्यापूर्वीच थोडीशी मदत हवी असेल तर यूटय़ूबवरील https://www.youtube.com/watchAGv=fHDqu4ZymBs ही लिंक जरूर पाहा.

मनाली रानडे  manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 1:04 am

Web Title: brain it on app for physics puzzles
Next Stories
1 भारतीयांचा भर मोबाइल गेमवर
2 झोपोचा ‘स्पीड ८’ बाजारात
3 नेक्सजीटीव्हीचे ‘आय-फेथ’ अॅबप
Just Now!
X