17 December 2017

News Flash

टेक-नॉलेज : भाषांतरासाठी टॅब हवा?

मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे.

तंत्रस्वामी | Updated: April 18, 2017 2:23 AM

मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे

मला मराठी-इंग्रजी भाषांतर, विकिपीडिया, इंटरनेट ब्राऊजिंग, इंग्रजी शब्दकोश आदी उपयोगांसाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हवा आहे किंवा टॅबलेटही चालेल. कृपया मला यातील पर्याय सुचवा.

-सायली शेठ, पुणे

तुम्हाला ज्या कामासाठी संगणक किंवा लॅपटॉप हवा आहे ती सर्व कामे आता टॅबलेटवर अगदी चांगल्या प्रकारे करता येऊ शकतात. टॅबलेटवर टायपिंगची अडचण असते; पण तुम्हाला टायपिंगचे किती काम करायचे आहे त्यावर हे ठरवता येईल. तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही बजेटचा उल्लेख केला असता तर पर्याय सुचविणे आणखी सोपे गेले असते. तुमच्या उपयोगासाठी नेटबुक, मिनी लॅपटॉपचे चांगले पर्यायही उपलब्ध आहेत. बाजारात एमएसआय, असूस, एचपी या चांगल्या ब्रँडचे मिनी लॅपटॉप पंधरा हजारांपासून उपलब्ध आहेत. तुम्ही टॅबचा विचार करणार असाल तर आयबॉलने नुकताच स्लाइड नावाचा टॅब बाजारात आणला आहे. या टॅबसोबत कीबोर्डही देण्यात आला आहे. टॅबसाठी कीबोर्ड असलेले एक विशिष्ट प्रकारचे कव्हर तयार करण्यात आले आहे. या टॅबमध्ये विंडोज 8.1 ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असून यात ३२ जीबी अंतर्गत साठवण सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय आपण कार्ड वापरून ही क्षमता वाढवू शकतो. यामध्ये एक टीबी क्लाऊड साठवणीचीही सुविधा देण्यात आली असून त्यासाठी काही पैसे मोजावे लागतात. हा डिटॅचेबल असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा टॅब आणि पाहिजे तेव्हा लॅपटॉप असे होऊ शकते. याची किंमत २४ हजार ९९९ इतकी आहे. असेच पर्याय एचपीमध्येही उपलब्ध आहेत.

माझ्या मोबाइलमध्ये आठ जीबी अंतर्गत साठवणूक क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे. असे असतानाही मला सतत मेमरी संपली असे सांगितले जाते. जर मला माहिती साठवायची असेल तर इतर कोणता पर्याय आहे का?

– शेखर पिंगळे, अंबरनाथ 

मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे. यामुळेच साठवणुकीसाठी क्लाऊडचा पर्याय समोर आला. या क्लाऊड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो, तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह, बॉक्स असे विविध अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.

First Published on April 18, 2017 2:23 am

Web Title: expert share technical knowledge on various issue