आज आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत आहेत. या फोनच्या माध्यमातून वापरकर्ते ‘स्मार्ट’ होत असले तरी, ग्रामीण किंवा निमशहरी भागांमध्ये अजूनही स्मार्टफोन तितकेसे रुजलेले नाहीत. किफायतशीर किंमत आणि विजेची समस्या या दोन गोष्टी त्याचे महत्त्वाचे कारण आहे. अशा भागांत उत्तम पर्याय ठरतोय ‘फीचर फोन’चा. इंटरनेटची सुविधा आणि अ‍ॅपच्या हाताळणीची सक्षमता असलेले हे फोन ‘स्मार्ट’ नसले तरी, आजही वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरत आहेत..

कदाचित सर्वोत्तम स्मार्टफोन्सने सर्वाचे लक्ष वेधून घेतले असेल, पण भारतीय मोबाइल फोन क्षेत्रामध्ये सर्वोत्तम फीचर फोन्सचा समावेश नाही. आतापर्यंत सामान्य डिवाइस भारतीय मोबाइल बाजारपेठेमध्ये जवळपास ५० टक्के बाजारपेठ शेअर प्राप्त करतो आणि लहान शहरे व गावांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांच्या पहिल्या पसंतीचा ठरतो. पण या सामान्य डिवाइसेसना आकर्षून घेणारी गोष्ट कोणती? वापरण्यामध्ये सुलभता व कमी विजेचा वापर करणारी डिवाइसेस लोकांच्या पसंतीचे आहेत, जे स्मार्टफोन्समधील जटिल वैशिष्टय़ांनी त्रस्त झालेले आहेत. स्मार्टफोन्सपेक्षा फीचर फोन्स खिशाला परवडणारी असून त्यामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान सामावलेले आहे, जे सर्व सुविधांनी युक्त असे गॅझेट बनले आहेत. फीचर फोन्समध्ये अनोखी वैशिष्टय़े सामावलेली आहेत, ते वापरण्यास सुलभ असून संवादांसाठी सर्व आवश्यक सेवा प्रदान करतात, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेमधील त्यांची मागणी वाढत आहेत.

ग्रामीण भागातील लोकांसाठी तांत्रिक अडथळे म्हणजे स्मार्टफोनमधील प्रादेशिक भाषांचा अभाव, अपुरे बॅटरी आयुर्मान आणि फीचर फोनच्या किमतीमधील चांगल्या दर्जाच्या डिवाइसेसच्या अभावामुळे फीचर फोन बाजारपेठेला मागणी आली आहे. तसेच फीचर फोनने ग्रामीण लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यामध्येसुद्धा मदत केली आहे.

या देशामध्ये समाविष्ट असलेल्या फीचर फोन विभागाची क्षमता पाहता, प्रमुख स्मार्टफोन कंपन्या वर्षभर प्रगत स्मार्टफोन्सना दाखल करत आहेत आणि त्यांनी फीचर फोन्स बंद केलेले नाहीत, या कंपन्या आजदेखील देशाच्या ग्रामीण बाजारपेठांसाठी या डिवाईसेसची निर्मिती करत आहेत. प्रमुख स्मार्टफोन कंपन्यांनी फीचर फोन्सची निर्मिती करत राहण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दुर्गम भागांपर्यंत व्यापक वितरण पोहोच निर्माण करण्यामध्ये त्यांना मदत होऊ शकेल आणि या कंपन्या भारताच्या ग्रामीण बाजारपेठांमधील फीचर फोन्सवर लक्ष केंद्रित करत विभागामध्ये भक्कम पाया कायम राखण्याकरिता नवीनतम मॉडेल्स दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शेवटी वर्षांनुवष्रे, स्मार्टफोन्सप्रमाणेच, फीचर फोन्स विभागानेसुद्धा दिवसेंदिवस प्रगती केली आहे. आज असे फीचर फोन्स उपलब्ध आहेत, जे युर्झसना व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकसारख्या अ‍ॅप्लिकेशन्सचा आनंद घेण्याची आणि म्युझिक अ‍ॅक्सेस करण्याची, ई-मेल्सचे प्रत्युत्तर देण्याची, अ‍ॅप्सचा वापर करत नेव्हिगेट करण्याची, बातम्यांसाठी वेब ब्राऊज करण्याची, फोटोज व सेल्फीज घेण्याची सुविधा प्रदान करतात. तसेच काही टेलिकॉम कंपन्यासुद्धा ४जी कनेक्टिव्हिटीने युक्त फीचर फोन्सवर लक्ष केंद्रित करत आहेत.

फीचर फोन ते स्मार्टफोन बदल ही एका तिमाहीची समस्या नाही, तर या मूलभूत डिवाइसेससाठी मागणी गेल्या काही तिमाहींमध्ये स्थिर गतीने वाढली आहे आणि किमान आगामी काही वर्षांमध्ये ही मागणी वाढतच जाईल. फीचर फोन्स निश्चितच सर्वाच्या पसंतीचे ठरतील. जरी बाजारपेठेमध्ये काही चढ-उतार होण्याची शक्यता असली, तरी सर्वोत्तम सेवा प्रदान करणाऱ्या या कमी किमतींमधील कम्युनिकेशन डिवाईसेससाठी मागणी भारतीय मोबाइल क्षेत्रामध्ये सुरूच राहील.

 श्री. दीपक काबू

(मुख्य कार्यकारी अधिकारी, झिऑक्स मोबाइल्स) यांच्याद्वारे लेख