20 February 2020

News Flash

टेकलाँच : ‘सॅमसंग’चा गॅलक्सी नोट ८

सॅमसंग गॅलक्सी नोट ८ हा ६.३ इंच आकाराचा क्वाड एचडी सुपर अमोल्ड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे.

सॅमसंग गॅलक्सी नोट ८ हा ६.३ इंच आकाराचा क्वाड एचडी सुपर अमोल्ड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे.

अ‍ॅपलच्या आयफोनची घोषणा १२ सप्टेंबर रोजी होऊ घातली असतानाच, सॅमसंगतर्फे नवी दिल्लीत होणाऱ्या एका परिषदेतून ‘गॅलक्सी नोट ८’चे सादरीकरण करण्यात येईल. मंगळवारी दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाची सॅमसंगने जोरदार तयारी चालवली आहे. सॅमसंग गॅलक्सी नोट ८ हा ६.३ इंच आकाराचा क्वाड एचडी सुपर अमोल्ड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. यातही सॅमसंगच्या एस ८ आणि एस ८ प्लसप्रमाणे इन्फिनिटी डिस्प्ले पुरवण्यात आला असून या फोनला मागील बाजूस प्रत्येकी १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे पुरवण्यात आले आहेत. पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. हा फोन अ‍ॅण्ड्रॉइड ७ या कार्यप्रणालीवर चालणारा असेल.

‘बीएसएनएल’ची कॉपरेरेट ईमेल सेवा

‘भारत संचार निगम लिमिटेड’ने (बीएसएनएल) जयपूरस्थित ‘डेटा इन्फोसिस’ या कंपनीच्या सहकार्याने कंपन्यांकरिता ‘कॉपरेरेट ई मेल’ सेवा सुरू केली आहे. एक रुपये प्रति दिन या दराने ही सेवा पुरवण्यात येत आहे. बीएसएनएलच्या ग्राहक कंपन्यांना वार्षिक ३६५ रुपये शुल्क भरून ही सेवा त्यांच्या संकेतस्थळांशी जोडता येईल. याअंतर्गत त्यांना एक जीबी साठवण क्षमता पुरवण्यात येईल. याखेरीज १० जीबी साठवण क्षमता असलेली ईमेल सुविधा घेण्यासाठी ९९९ रुपये शुल्क मोजावे लागेल. तसेच १० जीबीपेक्षा जास्त वापर झाल्यास ग्राहकांना अतिरिक्त पाच जीबी साठवण क्षमता खरेदी करण्यासाठी ५०० रुपये भरावे लागतील, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. सर्व ईमेलधारकांना ‘सिक्युरिटी टूल’ तसेच दुहेरी पडताळणीची सुविधा पुरवण्यात येईल.

‘फ्लिपकार्ट’वर ‘बिग बिलियन डेज’

‘फ्लिपकार्ट’ या ईकॉमर्स संकेतस्थळाने येत्या २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत ‘बिग बिलियन डेज’ हा ऑनलाइन विक्री महोत्सव आयोजित केला असून त्यादरम्यान या संकेतस्थळावरून विविध उत्पादने ९० टक्क्यांपर्यंत सवलतीत उपलब्ध होतील, असे कंपनीने जाहीर केले आहे. ही उत्पादने ग्राहकांना ‘नो कॉस्ट ईएमआय’, ‘प्रॉडक्ट एक्स्चेंज’, ‘बायबॅक गॅरंटी’, ‘बाय नाऊ पे लेटर’ अशा सुविधांनिशी उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच स्टेट बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्डधारकांना या खरेदीवर आणखी सूट देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

सोनीची नवी ‘ऑडिओ सिस्टीम’

सुस्पष्ट आवाज आणि अद्ययावत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनी इंडियाने गेल्या आठवडय़ात भारतीय बाजारात आणखी एक ‘ऑडिओ सिस्टीम’ दाखल केली आहे. घरबसल्या उत्तम दर्जाचा ध्वनिअनुभव घेण्याकरिता ही ‘ऑडिओ सिस्टीम’ उपयुक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘एमएचसी-व्ही९०डीडब्ल्यू’ नावाच्या या यंत्रणेत सुमारे १.७ मीटर उंचीचे टॉवर स्पीकर पुरवण्यात आले आहेत. या टॉवर स्पीकरना खालच्या बाजूस चाके पुरवण्यात आली असल्याने आपल्या सोयीने हे स्पीकर सहज हलवता येतात. या यंत्रणेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, केवळ हाताच्या इशाऱ्याने वापरकर्ते आवाज कमी-जास्त किंवा गाणी बदलू शकतात. यासाठी या यंत्रणेत ‘जेस्चर कंट्रोल’ सुविधा बसवण्यात आली आहे. याखेरीज वापरकर्ते आपल्या स्मार्टफोननेही ही यंत्रणा नियंत्रित करू शकतील. या यंत्रणेत गिटारकरिता एक ऑडिओ इनपूट पुरवण्यात आला असून यात ‘कराओके’चीही सुविधा आहे. याखेरीज यूएसबी, एचडीएमआय पोर्टची सुविधा असलेल्या या ‘ऑडिओ सिस्टीम’ची किंमत ६५,९९० रुपये इतकी आहे.

यूटय़ूबला अस्सल भारतीय ‘देखो’चा पर्याय

स्थानिक भारतीय डिजिटल युजर्सच्या व्हिडीओ शोधण्याच्या समस्येवर इंडस्ट्रीला देखोच्या (Dekkho) निमित्ताने यूटय़ूबला अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध झाला आहे. या मंचावर आघाडीच्या व्हिडीओ निर्मात्यांना एकत्रित आणून त्यांची कला सादर केली जाते. या अ‍ॅपचा सफाईदार अनुभव इंटरनेटवर जबरदस्त प्रसिद्ध झाला असून देशातील आघाडीच्या पाच हँडसेट उत्पादक कंपन्या देखोद्वारे वाटप करण्याचे हक्क मिळवण्यासाठी बोली लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पाच महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत ‘देखो’ने मोबाइल, वेब आणि ऑफलाइन भागीदारांद्वारे एक मिलियन युजर्स मिळवले असून हे अ‍ॅप डिफॉल्ट व्हिडीओ डेस्टिनेशन बनून यूटय़ूबची जागा घेण्यासाठी सज्ज होत आहे. ओटीटी व्हिडीओ शोधाला आकर्षक पैलू बहाल करून देखो भारतीय डिजिटल विश्वातील समीकरणे परत एकदा बदलण्यासाठी सज्ज होत आहे. त्याच्या सध्याच्या धोरणात्मक योजनेचा एक भाग म्हणून देखो आपल्या युजर्सना त्यांचा मित्रपरिवार अ‍ॅड करण्यासाठी, ग्रुप्स पाहण्यासाठी, कंटेट शेअर करण्यासाठी, इतर जण काय पाहत आहेत हे जाणून घेण्यासाठी, वेगवेगळ्या चॅनेल्सना सबस्क्राइब करण्यासाठी, आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करण्यासाठी मदत करणार आहे.

First Published on September 12, 2017 4:43 am

Web Title: gadgets launched this week
Next Stories
1 भारतीयांसाठी ‘स्मार्ट’फोन
2 टेकलाँच : ‘नोकिया १३०’ भारतात उपलब्ध
3 ‘अ‍ॅडवेअर’चा धोका
Just Now!
X