X

आसूसद्वारे विवोबुक-एस-१५ भारतात दाखल    

‘झेनबुक-यूएक्स-४३०’ हा आतापर्यंत सर्वात बारीक झेनबुक असून त्यात आगळीवेगळी ग्राफिक आहे. त्या

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आसूसने ‘बियाँड द एज’ कार्यक्रमाअंतर्गत भारतात ‘विवोबुक-एस-१५’च्या दाखलीकरणाची घोषणा केली. याच कार्यक्रमात झेनबुक यूएक्स ४३० या डिस्क्रिट ग्राफिकने युक्त आतापर्यंतच्या सर्वाधिक कमी जाडीच्या झेनबुकचेदेखील अनावरण केले. नवीन झेनबुक आणि विवोबुक बारीक आणि वजनाने हलके असून त्यांची रचना आणि त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाइल आणि लॅपटॉपमधील सीमारेषा धूसर झाल्या आहेत.

आसूस ‘विवोबुक-एस-१५’ १५.६ इंचाचा असून त्याचे वजन अवघे १.७ किलो आहे. नॅनो एज डिस्प्ले टेक्नॉलॉजी, ७.८ मिमी जाडीचा आणि मोठा स्क्रीन डिस्प्ले यामुळे नेत्रसुखद परिणाम अनुभवता येतो. दिसायला आकर्षक अशा या लॅपटॉपमध्ये आठव्या जनरेशनच्या इंटेल कोअर आय ७ चा प्रोसेसर, १६ जीबी डीडीआर४ मेमरी आणि एनव्हीआयडीआयए हे फीचर्स आहेत. त्याची १६ जीबी इतकी मेमरी असल्याने तो कार्यकुशल ठरतो. आसूस ‘विवोबुक-एस-१५’ ऑनलाइन आणि रिटेलरकडे ५९,९९०/- रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहे.

‘झेनबुक-यूएक्स-४३०’ हा आतापर्यंत सर्वात बारीक झेनबुक असून त्यात आगळीवेगळी ग्राफिक आहे. त्याचे वजन अवघे १.२५ किलो असून संपूर्ण एचडी १४ इंचाची स्क्रीन आहे. यात विंडो १० आहे. स्क्रीनच्या कडा अतिशय बारीक असल्यामुळे स्क्रीन आहे त्यापेक्षा मोठा दिसतो. त्यात १७८ डिग्रीमध्ये विस्तृत दृश्य दिसते, स्क्रीनवर मॅट फिनिशिंग असल्यामुळे त्यात प्रतिबिंब पडत नाही. ‘झेनबुक यूएक्स ४३०’मध्ये इंटेलचे आठवे जनरेशन कोअर आय ७चा प्रोसेसर आहे. त्याची मुख्य मेमरी १६ जीबी असून ती ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ  शकते. याची बॅटरी नऊ  तास चालते. झेनबुक यूएक्स ४३० ची किंमत रुपये ७४,९९०/- आहे.

क्रीडा प्रेक्षकांसाठी नवी सुविधा

फुटबॉल असो किंवा क्रिकेट असो, आपण पाहात असलेला सामना अधिक चांगल्या अँगलने किंवा अधिक चांगल्या दर्जाचा पाहाता यावा, अशी आपली इच्छा असते. ही इच्छा आता टाटा स्कायने पूर्ण केली आहे. टाटा स्कायने स्टार स्पोर्ट्सच्या सहकार्याने ‘स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एक्स्पिरिअन्स’ या सेवेची घोषणा केली आहे. या सेवेमुळे क्रीडाप्रेमींना त्यांच्या आवडत्या खेळाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. एकाच वेळी अनेक लाइव्ह सामने पाहण्याची संधीही मिळणार आहे. ही सुविधा वापरण्यासाठी टाटा स्कायच्या वापरकर्त्यांनी स्टार स्पोर्ट्सवर दिसणाऱ्या लाल बटणाचा पर्याय निवडावा. यानंतर तुम्हाला ‘स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एक्स्पिरिअन्स’ सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये तुम्ही एकाच सामन्याचे वेगवेगळ्या अँगलने प्रक्षेपण पाहू शकता. इतकेच नव्हे तर विम्बल्डन किंवा ऑलिम्पिक्ससारख्या क्रीडा स्पर्धामध्ये एकाच वेळी अनेक सामने सुरू असतात. ते एकाच वेळी एकाच स्क्रीनवर पाहण्याची सुविधा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. पारंपरिक मनोरंजन सुविधांच्या पुढे जाऊन विचार करण्याचा टाटा स्कायचा प्रयत्न असतो. यामुळेच कोणताही अतिरिक्त आकार न लावता ‘स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एक्स्पिरिअन्स’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे टाटा स्कायचे मुख्य कण्टेण्ट अधिकारी अरुण उन्नी यांनी सांगितले. या सुविधेत प्रेक्षकांना हायलाइट्स तसेच खेळ आणि खेळाडूंविषयीची अधिक माहितीही मिळवता येणार आहे, असेही ते म्हणाले.

‘क्लिअरटॅक्स’ जीएसटी सॉफ्टवेअरमध्ये नवीन सुविधा

मुंबई : देशभर लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कराची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी ‘क्लिअरटॅक्स’ या कंपनीने बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अधिक सुविधांची भर टाकण्यात आली आहे. या सुविधेमुळे व्यावसायिकांना ‘क्रेडिट फ्लो’बाबत लगेच माहिती मिळू शकणार आहे. ‘क्लिअरटॅक्स’च्या जीएसटी सॉफ्टवेअरवरील ‘जीएसटीआर-२ ए’ या सुविधेच्या साह्य़ाने सर्व नोंदणीकृत वितरक त्यांच्या विक्रेत्यांनी ‘जीएसटीआर-१’ व्यवस्थित भरले आहे का, हे तपासून पाहू शकतात. तसेच यात काही त्रुटी आढळल्यास १० ऑक्टोबरपूर्वी ते भरण्याचा आग्रहही धरू शकतात. ‘जीएसटीआर-१’ हा व्यवसायांच्या ‘आऊटपूट’चा परतावा असून ‘जीएसटीआर-२’ हा ‘इनपूट’चा परतावा आहे. एका ठरावीक व्यापारी समस्येशी निगडित सर्व व्हेंडर्सच्या जीएसटीआर-१ वरील माहितीवरून आपोआप म्हणजेच स्वयंचलित रीतीने जीएसटीआर-२ ए हा अर्ज भरला जात असून सरकारने हा अर्ज व्यापाऱ्यांच्या करपरताव्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.

Outbrain