स्मार्टफोनमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅण्ड्रॉइड या आज्ञावलीची नवी आवृत्ती बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. या आवृत्तीमध्ये इतर स्मार्ट उपकरणांचा वाढता वापर लक्षात घेऊन काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या आवृत्तीचे नाव ‘ओ’ या आद्याक्षरापासून सुरू होणार आहे. या नवीन आवृत्तीपर्यंत वापरकर्त्यांना आणणे हे गुगलसाठी मोठे आव्हान असणार आहे. पाहू या काय आहे या नवीन आवृत्तीमध्ये.

सर्च इंजीननंतर मोबाइल आज्ञावलीमध्ये अग्रस्थान मिळवलेल्या गुगल या कंपनीने नुकतीच मोबाइल आज्ञावलीच्या नवीन आवृत्तीची घोषणा केली. या आवृत्तीचे नाव ‘ओ’ या आद्याक्षरापासून सुरू होणार आहे. मात्र अद्याप नेमके नाव काय असेल याबाबत कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. गुगलच्या अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष डेव्ह बुर्के यांनी त्यांच्या ब्लॉगवर नुकतीच गुगल ‘ओ’बद्दल माहिती प्रसिद्ध केली. यानंतर काही विकासकांनी या आज्ञावलीमध्ये अनेक ‘बग’ असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानुसार बुर्के यांनी लवकरच यातील ‘बग’ काढले जातील, असे स्पष्टीकरणही दिले. गुगलच्या येत्या आयओ डेव्हलपर्स परिषदेमध्ये ‘ओ’ या आज्ञावलीवर सखोल चर्चा करून त्यातील त्रुटी दूर केल्या जाणार असल्याचेही बुर्के यांनी स्पष्ट केले.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
through online transactions, airline employee, defrauded, shil pahata area, thane
ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
Google agreed to destroy browsing of data records to settle a lawsuit claiming it secretly tracked internet use of people
गूगल करणार अब्जावधी युजर्सचा डेटा डिलीट, नेमकं काय आहे प्रकरण, जाणून घ्या

कोणत्या उपकरणावर उपलब्ध?

ही आज्ञावली सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या गुगल नेक्सस ५ एक्स, गुगल नेक्सस ६ पी, नेक्सस प्लेअर, गुगल पिक्सेल, पिक्सेल सी या मोबाइलवर विकासकांसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर अ‍ॅण्ड्रॉइड वेअर २.०चीही चाचणी केली जाणार आहे. त्याची आज्ञावलीही बाजारात उपलब्ध आहे. या अज्ञावलीमध्ये अजून खूप साऱ्या सुविधा द्यायच्या बाकी आहेत. याचबरोबर आज्ञावलीची स्थिरता व त्याचा काम करण्याचा वेग या दोन्ही गोष्टीही सातत्यपूर्ण पाहिल्या जात आहेत. पण ती आता गुगलच्या काही मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात आल्याचे बुर्के यांनी ब्लॉगवर लिहिले आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही विकासकांसाठी अद्ययावत आज्ञावली उपलब्ध करून देणार आहोत आणि आम्ही मे अखेपर्यंत आम्ही परिपूर्ण विकासक आवृत्ती उपलब्ध करून देणार आहोत, असेही बुर्के यांनी नमूद केले.

अ‍ॅण्ड्रॉइड ‘ओ’ची वैशिष्टय़े

अ‍ॅण्ड्रॉइड ‘ओ’मध्ये अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी नवीन सुविधा आणि ‘अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय) देण्यात आले आहे. यात ‘बॅकग्राऊंड लिमिट’ची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी क्षमता वाढू  शकणार आहे याचबरोबर फोनचा संवाद साधण्याचा वेगही वाढणार आहे. सध्याच्या आज्ञावलीमध्ये आपण कोणतेही अ‍ॅप वापरत नसताना बॅकग्राऊंडमध्ये अ‍ॅप चालू राहतात यामुळे बॅटरी खर्च होते. यात अ‍ॅपच्या बॅकग्राऊंडमधील अपडेटमध्ये मर्यादा देण्यात आली आहे. यामुळे बॅटरी कमी खर्च होते. नवीन आज्ञावलीत विशेष करून ‘इम्प्लिसिट ब्रॉडकास्ट, बॅकग्राऊंड सेवा आणि लोकेशन अपडेट’ या सेवांवर मर्यादा आणण्यात आली आहे.

याशिवाय या आज्ञावलीमध्ये ‘नोटिफिकेशन चॅनल्स’ची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे वापरकर्त्यांला विविध प्रकारच्या नोटिफिकेशनवर नियंत्रण ठेवता येऊ शकणार आहे. ते एखाद्या प्रकारची नोटिफिकेशन ब्लॉक करू शकतात याचबरोबर त्यात बदलही करू शकतात. याचबरोबर यामध्ये नवीन ‘युजर इंटरफेस’ आणि नोटिफिकेशनसाठी ग्रुपिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे एखाद्या गटाच्या नोटिफिकेशन एकाच वेळी वाचता येऊ शकणार आहे.

या ऑपरेटिंग प्रणालीमध्ये ‘ऑटोफिल एपीआय’ची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आपल्याला कोणत्याही संकेतस्थळावर अथवा अ‍ॅपवर लॉगइन करण्यासाठी अर्ज भरावा लागतो तेव्हा सातत्याने भरावी लागणारी माहिती या सुविधेमुळे आपोआप भरली जाणार आहे. यामध्ये वापरकर्त्यांचा ‘ई-मेल आयडी, पत्ता, वापरकर्त्यांचे नाव आणि पासवर्ड’ यांचा समावेश असणार आहे.

tecq02याशिवाय यामध्ये ‘पिक्चर इन पिक्चर’ (पीआयपी) सुविधाही देण्यात आली आहे. ही सुविधा यापूर्वी अ‍ॅण्ड्रॉइड टीव्हीवर देण्यात आली होती. यामध्ये वापरकर्ते विविध प्रकारचे व्हिडीओज शोधू शकतात. यामध्ये आपण व्हिडीओ पाहू शकतो याचबरोबर व्हिडीओ चॅटिंगही करता येऊ शकते. स्मार्टफोनवर किंवा टॅबलेटच्या स्क्रीनवर छोटा बॉक्स येतो. यामध्ये वापरकर्ता त्याला पाहिजे त्या आकारात हा बॉक्स फिक्स करू शकतो.

यामध्ये आणखी एक आकर्षक बाब देण्यात आली आहे. ज्याला ‘अ‍ॅडप्टिव्ह आयकॉन्स’ असे म्हटले जाते. यात अ‍ॅप विकासक त्यांच्या अ‍ॅपचे आयकॉन त्यांना पाहिजे त्या आकारात पाहिजे त्या रंगात प्रत्येक मोबाइलनुसार वेगवेगळे आयकॉन तयार करता येऊ शकतात. हे आयकॉन चौकोनी, गोलाकार अशा कोणत्याही आकारात दिसू शकतात. अ‍ॅप विकासक यामध्ये अगदी अ‍ॅनिमेटड आयकॉनही तयार करता येऊ शकतात. नवीन आज्ञावलीमध्ये आवाजाचा दर्जाही अधिक सुधारणार आहे. यामुळे ही आज्ञावली असलेल्या फोनमध्ये उच्च क्षमतेचे ब्लूटय़ूथ ऑडिओ कॉड्स वापरता येऊ शकणार आहेत. सध्याच्या आज्ञावलीत ‘एलडॅक’ कॉड्स वापरता येऊ शकत नाही.

नवीन आज्ञावलीत वाय-फाय अवेअरची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आवश्यक ते हार्डवेअर, अ‍ॅप्स असतील तर आजूबाजूचे दोन स्मार्टफोन्स एकमेकांशी इंटरनेटशिवाय जोडले जाऊ शकतात. या सर्व सुविधांमुळे ही आज्ञावली आत्तापर्यंतच्या आज्ञावलीपेक्षा वेगळी ठरणार आहे.

– नीरज पंडित  @nirajcpandit  

Niraj.pandit@expressindia.com