सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर सर्वात जास्त धुमाकूळ सुरूय तो ‘जिफ’ (gif) फाइल्सचा. अतिशय छोटय़ा आकाराच्या व काही सेकंदांच्या या गमतीशीर क्लिप सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. या ‘जिफ’ क्लिप कोणत्याही वेब ब्राऊजर, संगणक तसेच कोणत्याही स्मार्टफोनवर चालवता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचा आकार कमी असल्याने त्या पटकन डाऊनलोड होतात. त्यामुळे अलीकडे ‘जिफ मेकर’ अ‍ॅप आणि सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. याच पाश्र्वभूमीवर आपल्याजवळील व्हिडीओ फाइल्सच्या ‘जिफ’ फाइल कशा बनवायच्या, याच्या टिप्स आम्ही देत आहोत.

‘व्हिडीओपॅड व्हिडीओ एडिटर’ हे अ‍ॅप वापरून तुम्ही तुमचे व्हिडीओ आकाराने छोटे करून ते ‘जिफ’मध्ये कन्व्हर्ट करू शकता. त्यासाठी ‘व्हिडीओपॅड व्हिडीओ एडिटर’ डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. मग हा प्रोग्रॅम सुरू करून ‘ओपन प्रोजेक्ट’ चा पर्याय निवडा. त्यामध्ये तुम्हाला हवा तो ‘व्हिडीओ’ निवडा व ‘ओपन’ हा पर्याय निवडा. त्यानंतर संबंधित ‘क्लिप’ प्रोग्रॅमच्या तळाशी असलेल्या ‘टाइमलाइन विंडो’मध्ये ‘क्लिक अँड ड्रॅग’ करा.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
Loksabha Election 2024 Last 72 hours most crucial during elections
मतदानापूर्वीचे ३ दिवस का महत्त्वाचे असतात? काय असते प्रक्रिया?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

‘टाइमलाइन विंडो’वर क्लिपवर तुम्हाला ‘रेड मार्कर’ दिसतील. या मार्करच्या साह्याने तुम्ही संबंधित व्हिडीओवरील तुम्हाला हवा तो भाग ‘मार्क’ करून घ्या. यासाठी ‘क्लिप’च्या सुरुवातीला असलेला मार्कर तुम्हाला हव्या तेवढय़ा भागाच्या सुरुवातीला आणून ठेवा. त्याचप्रमाणे त्या भागाच्या शेवटीही मार्किंग करा. यानंतर ‘प्ले’ बटण दाबून तुम्ही निवडलेला भाग व्यवस्थित आहे का, याची खातरजमा करून घ्या. तुम्ही निवडलेल्या ‘क्लिप’ला ‘स्पेशल इफेक्ट’ही देऊ शकता. याशिवाय ‘प्लेबॅक’चा वेग कमी-जास्त करण्याचा पर्यायही तुम्हाला उपलब्ध असतो.

तुम्हाला हवी तशी ‘क्लिप’ तयार झाल्यानंतर प्रोग्रॅमवरील ‘एक्स्पोर्ट’ बटण दाबून ‘जिफ’ फाइल निवडा. येथे तुम्हाला ‘जिफ’ फाइलचे रेझोल्युशन ठरवता येईल. सोशल मीडियावरील ‘जिफ’ फाइलला १२०० बाय ६२८ इतके रेझोल्युशन योग्य असते. तर ट्विटरसाठी १०२४ बाय ५१२ रेझोल्युशन ठरवता येईल.

तुम्हाला ‘फ्रेम रेट’ही ठरवता येईल. ‘१५ फ्रेम पर सेकंड’ (एफपीएस) हा ‘जिफ’  फाइलसाठी योग्य पर्याय आहे. हा पर्याय निवडण्यासाठी ‘कॉन्स्टंट फ्रेम रेट’ हा पर्याय निवडा. त्यानंतर ‘एन्कोडर सेटिंग’ निवडून ‘लूपिंग’ पर्यायावर क्लिक करा. ‘लूपिंग’ केल्यामुळे तुमची ‘जिफ’ क्लिप सातत्याने ‘प्ले’ होत राहते व त्यात गंमत येते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ‘क्रिएट’ करून तुम्ही जिफ फाइल सोशल मीडियावर  शेअर करू शकता.