News Flash

Huawei चा Honor 8 स्मार्टफोन दाखल!

४ जीबी रॅम, ड्युअल कॅमेरा आणि ३२ जीबीची अंतर्गत मेमरी

गेल्यावर्षी आलेल्या ऑनर ७ चे हे लेटेस्ट वर्जन आहे (Photo: Indian Express)

स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या हुवाई कंपनीने भारतात Honor 8 या त्यांच्या स्मार्टफोनचे अनावरण केले आहे. हा फोन केवळ फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या संकेतस्थळांवरच उपलब्ध करण्यात आला आहे. ड्युअल कॅमेरा हे या फोनमधील खास वैशिष्ट्य आहे. हुवाईच्या P9 स्मार्टफोनमध्येदेखील ही सुविधा पाहण्यात आली होती. गेल्या वर्षी बाजारात आणलेल्या ऑनर ७ फोनचे हे लेटेस्ट वर्जन आहे. या फोनसोबतच कंपनीने ऑनर ८ स्मार्ट आणि हॉली ३ या स्मार्टफोनचेदेखील अनावरण केले.

ऑनर ८ ची वैशिष्ट्ये

५.२ चा डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये १.८ GHz चा ऑक्टा-कोर किरीन ९५० प्रोसेसर देण्यात आल आहे. f/2.2 अॅपॅचरसह १२ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला असून, यात लेझर ऑटोफोकस आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसुध्दा देण्यात आला आहे. एक सेंसर रंगाची माहिती घेतो तर अन्य सेंसर उत्तम कॉन्ट्राससह मोनोक्रोम इमेज घेत असल्याचे दोन कॅमेऱ्यांचे विश्लेषण करताना कंपनीने म्हटले आहे. फोनमधील फ्रण्ट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. ४ जीबीचा रॅम असलेल्या या फोनची अंतर्गत मेमरी ३२ जीबी इतकी असून ती १२८ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डाचा वापर करून वाढवता येऊ शकते. यात असलेली 3000 mAh बॅटरी नऊ तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रिमिंग करू शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याचबरोबर २४ तासांपर्यंत संगीत ऐकणे शक्य असल्याचेदेखील म्हटले आहे. फास्ट चार्जिंगची सुविधा असलेली ही बॅटरी १०० मिनिटांत फुल चार्ज होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर केवळ अर्ध्या तासांत ती ४७ टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

व्हिडिओमध्ये पाहा Huawei च्या Honor 8 स्मार्टफोनचा फर्स्ट लूक

तर, ऑनर ७ स्मार्टफोनमध्येदेखील ५.२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला असला तरी या फोनचा रॅम कमी आहे. यात २ जीबीचा रॅम आणि १६ जीबीची इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा, ३००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

अॅण्ड्रॉइड ६.० मार्शमेलो प्रणालीवर काम करणाऱ्या Holly 3 फोनमध्ये ३१०० एमएएच ची बॅटरी, २ जीबी रॅम, १६ जीबीची इंटरनल मेमरी, १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रण्ट कॅमेरा देण्यात आल आहे.

किंमत : कंपनीने Honor 8 स्मार्टफोनची किंमत २९,९९९ रुपये, Honor 8 Smart ची किंमत १९,९९९ रुपये तर Holly 3 ची किंमत ९,९९९ इतकी ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 7:14 pm

Web Title: huawei launched dual camera phone honor 8 with honor 8 smart and holly 3 smartphone
Next Stories
1 पैसा आला परतून!
2 टेक-नॉलेज : सरकारी संकेतस्थळाचा तपशील हवा
3 अस्सं कस्सं? : संकेतस्थळ वापराचे संकेत
Just Now!
X