ऑनलाइन छळामुळे पीडितांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. सुमारे ४५ टक्के व्यक्तींनी अशा छळवणुकीमुळे राग, चिडचिड झाल्याचे म्हटले आहे. तर ३६ टक्के जणांनी अशा प्रकारानंतर नैराश्य आल्याचे कबूल केले आहे. अशा प्रकारानंतर सोशल मीडियावरील व्यक्तिगतपणाच्या सेटिंग वाढवल्याचे ३३ टक्के लोकांनी सर्वेक्षणादरम्यान सांगितले. तर २८ टक्के लोकांनी अशा प्रकारांचा कामावर तसेच अभ्यासावर परिणाम झाल्याचे म्हटले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २४ टक्के जणांनी अशा घटनांनंतर मैत्री तुटल्याचे नमूद केले आहे.

ऑनलाइन छळाशी कसे लढाल?

* तुमची सुरक्षा आणि व्यक्तिगत सेटिंग तपासून बघा.

* पासवर्ड नियमित बदला.

* असे प्रकार करणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नका.

* तुम्हाला आलेले छळवणुकीचे संदेश, छायाचित्रे किंवा चित्रफीत यांचे पुरावे जपून ठेवा.

* एखाद्याचा ऑनलाइन छळ होत असेल तर त्याची मदत करा.

* अशा प्रकरणांची तक्रार त्वरित सुरक्षा यंत्रणांकडे करा.

* एखाद्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास त्याबाबत संकेतस्थळाकडे रीतसर तक्रार नोंदवून तो मजकूर हटवण्याची सूचना करा.