11 July 2020

News Flash

टीव्ही ‘स्मार्ट’ झाला!

आपला सध्याचा एलसीडी किंवा एलईडी टीव्ही आपण स्मार्ट टीव्ही म्हणून वापरू शकतो.

सध्या बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही आले आहेत. पण त्यांची किंमत इतकी जास्त आहे की सर्वानाच ते परवडतात असे नाही. मग यावर उपाय म्हणून तुम्ही नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन स्टीक याचा वापर करून तुमचा टीव्ही स्मार्ट करता. पण सर्वानाच या पर्यायांशी फारशी ओळख नाही. तसेच अनेकांना हे पर्याय वापरले म्हणजे सध्याच्या टीव्ही मालिकांना रामराम करायचा असे वाटते. पण तुमचा स्मार्टफोन जोडून तुमचा सध्याचा एलईडी किंवा एलसीडी टीव्ही स्मार्ट टीव्ही करू शकता. हे कसे करता येईल हे पाहुयात.

सध्या मनोरंजनासाठी सर्वाधिक मोबाइल आणि टॅबलेटचा वापर होत असला तरी टीव्हीसमोर बसून मनोरंजन कार्यक्रम पाहण्याची मज्जा त्यामध्ये येत नाही. यामुळेच बाजारात स्मार्ट टीव्हीची विक्री होऊ लागली. पण त्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे बहुतांश लोक त्याकडे पाठ फिरवू लागले. कालांतराने स्ट्रीमिंग बॉक्सचा पर्याय समोर आला. याचा वापर करून आपला सध्याचा एलसीडी किंवा एलईडी टीव्ही आपण स्मार्ट टीव्ही म्हणून वापरू शकतो. पण याच्या वापराबाबतही लोकांमध्ये फारशी जागरूकता न पसरल्यामुळे आजही त्याची विक्री म्हणावी तितकी होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून क्रोमकास्ट किंवा तुमचा स्मार्टफोन एचडीएमआर पोर्टने जोडून तुम्ही तुमचा साधा टीव्हीही स्मार्ट बनवू शकता. यासाठी तुमच्याकडे एचडीएमआय केबल असणे आवश्यक आहे. ही केबल असली की त्याद्वारे तुम्ही तुमचा मोबाइल टीव्हीला जोडू शकता.

एकदा तुम्ही तुमचा मोबाइल एचडीएमआय पोर्टने टीव्हीला जोडला की, तुम्हाला टीव्हीच्या रिमोटमधील इनपूट या पर्यायाचा वापर करून एचडीएमआय हा सोर्स निवडावा लागेल. हे करत असताना तुमचा फोन हा लँडस्केप मोडवर असावा याची दक्षता घ्या. तुम्ही ही जोडणी आयपॅडने केली असेल तर त्याचा आस्पेक्ट रेशो ४:३ इतका राहतो. फेसबूक किंवा वेब ब्राऊझिंगसाठी एवढी स्क्रीन पुरेशी आहे. हेच जर तुमच्याकडे अँड्रॉइड टॅबलेट असेल तर त्याचा आस्पेक्ट रेशो १६:९ इतका मिळू शकतो. ज्यावेळेस तुम्ही एचडीएमआय वायरने टीव्हीशी जोडणी करता तेव्हा टॅबलेट किंवा स्मार्टफोन टीव्ही सुरू असताना वापरता येत नाही. जर तुम्ही चित्रपट पाहात असाल तर हा पर्याय अगदीच उत्तम ठरतो. मात्र गेम खेळण्यासाठी किंवा यू-टय़ुब व्हिडीओ पाहण्यासाठी हा पर्याय तितकासा योग्य ठरत नाही.

स्लिम पोर्ट

स्मार्टफोन टॅबलेट आणि कॅमेरा या सर्वाना जोडणारे उपकरण म्हणजे स्लिमफिटचा वापरही फोन आणि टीव्हीची जोडणी करण्यासाठी होऊ शकतो. पण यामधून केवळ ऑडिओ आणि व्हिडीओ या दोन गोष्टीच पाहता येऊ शकतात. तसेच ही सुविधा सर्वच अँड्रॉइड फोनमध्ये उपलब्ध नाही. यामुळे तुमच्या उपकरणात स्लिमपोर्ट आहे की नाही हे आधी तपासून घ्यावे लागेल मगच तुम्ही या माध्यमातून टीव्हीशी जोडणी करू शकता. जर नसेल तर तुम्ही स्लिमफिट अ‍ॅडप्टर आणि एचडीएमआय पोर्टच्या माध्यमातून मोबाइल टीव्हीशी जोडू शकता.

अशा विविध प्रकारे तुम्ही मोबाइल किंवा टॅबलेटचा वापर करून तुमचा एलसीडी किंवा एलईडी टीव्ही स्मार्ट करू शकता.

क्रोमकास्टचा वापर

गुगल क्रोमकास्टचा वापर करून तुम्ही वायररहित जोडणी करू शकता. म्हणजे तुम्ही तुमचा स्मार्टफोन तुमच्या हातात ठेवून किंवा टेबलवर ठेवून त्याचा वापर टीव्हीवर करू शकता. क्रोमकास्ट डोंगल हे अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही किंवा अ‍ॅपल टीव्हीसारखी सुविधा देत नाही. त्याच्या माध्यमातून केवळ आपण एकावेळी अनेक उपकरणे वायररहित इंटरनेटशी जोडू शकतो. यामुळे क्रोमकास्ट स्वत:हून काहीच करत नाही त्याचे सर्व काम हे अँड्रॉइड उपकरणावरच अवलंबून असते. हे क्रोमकास्ट इतर सर्व डोंगल किंवा अ‍ॅमेझॉन फायर टीव्ही अथवा रोकूसारख्या सुविधांसारखे नाही. हे क्रोमकास्ट तुम्ही तुमच्या टीव्हीला जोडले की तुम्ही टीव्हीवर गुगल होम अ‍ॅपच्या माध्यमातून क्रोमकास्ट सुरू करू शकतात. ते सुरू झाले की वायफायच्या माध्यमातून तुमचा टीव्ही आणि मोबाइल एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. हे जोडले गेले की तुम्ही तुमच्या टीव्हीमध्ये मोबाइल किंवा टॅबलेटमधील अ‍ॅप वापरू शकता.

एमएचएलचा वापर

जर तुमच्याकडे मायक्रो एचडीएमआय पोर्ट नसेल तर तुम्ही मोबाइल हाय डेफिनेशन लिंक (एमएचएल)चा वापर करून तुम्ही तुमचा फोन टीव्हीला जोडू शकता. हा मायक्रो यूएसबी ते एचडीएमआय अ‍ॅडप्टर असतो. बहुतांश नामांकित कंपन्यांची उपकरणे अँड्रॉइड स्मार्टफोन आणि टॅबलेट एमएचएलच्या साह्याने जोडले जाऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 12:43 am

Web Title: led tv or lcd tv become smart tv
Next Stories
1 प्रादेशिक मनोरंजनाची लाट
2 टेक-नॉलेज : मोबाइलवर ट्रेन ड्रायव्हिंगचा गेम हवा आहे
3 ‘डबललॉकर’चे संकट
Just Now!
X