20 November 2017

News Flash

LG G6 स्मार्टफोन भारतात दाखल

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एलजीने आपला LG G6 फोन भारतात लाँच केला आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 24, 2017 5:39 PM

LG G6

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी एलजीने आपला LG G6 फोन भारतात लाँच केला आहे. फोनची किंमत ५१,९९० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळ अॅमेझॉनवर या फोनची विक्री करण्यात येणार आहे. या फोनसोबत एलजीचा टोन अॅक्टिव्ह प्लस वायरलेस हेडफोन खरेदी केल्यास हेडफोनवर ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. हेडफोनची किंमत ९,९९० रुपये इतकी आहे. त्याचबरोबर रिलायन्स जिओ वापरणाऱ्यांना १०० जीबी डेटा फ्री मिळणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला ३०९ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. ज्यावर १० जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. २०१८ च्या मार्च महिन्यापर्यंत पुढील १० रिचार्जला प्रत्येकवेळी हा अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. LG G6 फोनची वैशिष्ट्ये सांगायची झाल्यास या फोनमध्ये ५.७ इंचाचा क्यूएचडी (१४४०x२८८० पिक्सल) डिस्प्ले देण्यात आल आहे. या डिस्प्लेवर गेमिंग आणि व्हिडिओचा उत्कृष्ट अनुभव घेता येईल, असा दावा कंपनीने केला आहे. त्याचबोरबर फोनचा डिस्प्ले मोठा असला तरीदेखील फोन आरामात एका हाताने हाताळता येईल अशी फोनची रचना करण्यात आल्याचेदेखील कंपनीने म्हटले आहे.

LG G6 PHOTO : LG

फोनमध्ये क्वॉलकॅम स्नॅपड्रेगॉन ८२१ क्वाडकोर प्रोसेसर, 4GB रॅम, 64GB इंटरनल मेमरी जी मायक्रोएसडी कार्डचा वापर करून वाढवता येऊ शकते, १३ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा ज्यात वाइड अँगल लेन्सचा वापर करून १२५ डिग्री फिल्ड ऑफ व्हू सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिअर कॅमेऱ्याला 4K व्हिडिओ सपोर्ट देण्यात आला आहे. तर पुढील कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. हा फोन गुगलच्या नूगा ७.१ या लेटेस्ट अॅण्ड्रॉइड प्रणालीवर काम करतो. डस्ट प्रूफ आणि वॉटर प्रूफ ही या फोनची खास वैशिष्ट्ये आहेत.

कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पर्याय उपलब्ध आहेत. जलद चार्जिंगसाठी क्विक चार्ज 3.0 सपोर्ट दिला असून, फोनमध्ये 3,300 mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. उत्तम आवाजासाठी यात 32-बीट क्वाड डेक उपलब्ध आहे. हा पहिला नॉन पिक्सल स्मार्टफोन असून, यात गूगल असिस्टंट फिचर प्रिलोडेड आहे.

फोनचे प्री बुकिंग केल्यास ७००० पर्यंतचे कॅशबॅक मिळू शकते. यासाठी एक अट आहे, केवळ HDFC बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना ५००० रुपयांची अतिरिक्त कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. तर २००० रुपयांची कॅशबॅक ऑफर प्री बुकिंग करणाऱ्या सर्वांना उपलब्ध आहे. १ मेच्या पूर्वी जो कोणी HDFC बँक अथवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्डाने LG G6 चे प्री बुकिंग करेल अशा सर्वांना ७००० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. त्याचबरोबर वन टाइम स्क्रिन रिप्लेसमेंटवर ५० टक्के सूट देण्यात येईल.

First Published on April 24, 2017 5:39 pm

Web Title: lg g6 smartphone price specifications and features launched at rupees 51990