पॉश मोबाईल कंपनीने मायक्रो एक्सएस २४० हा जगातील सर्वात लहान स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल केला आहे. या स्मार्टफोनच्या फर्स्टलूकचा व्हिडिओ नुकताच यूट्युबवर झळकला. मायक्रो एक्सएस २४० या स्मार्टफोनची स्क्रिन फक्त २.४ इंचाची आहे. हा फोन लहान असला तरी त्यातील फिचर्स मात्र दमदार आहेत. ड्युएल कोअर प्रोसेसर देण्यात आला असून, ५१२ एमबीची रॅम मोबाईलमध्ये आहे. याशिवाय, ४ जीबीची इंटरनल मेमरी फोनमध्ये आहे. दोन मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, तर समोरील कॅमेरा व्हीजीए आहे. अँड्रॉईड ४.४ किटकॅट व्हर्जन यात देण्यात आले आहे. मोबाईलचा की पॅड अत्यंत लहान असल्याने टाईप करताना यूजर्सला अडचणींना सामोरे जावे लागेल. अर्थात मोठ्या स्क्रिनचे मोबाईल वापरणाऱयांच्या हा स्मार्टफोन पचनी पडणार नाही.