गेल्या आर्थिक वर्षांत भारतीय बनावटीच्या फोन्सना चांगलीच मागणी वाढल्याचे काही अहवालावरून समोर आले आहे. मागच्या आर्थिक वर्षांत भारतीय बनावटीच्या मोबाइलच्या विक्रीत तब्बल २५ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. चिनी बनावटीच्या स्वस्त आणि मस्त फोन्सच्या स्पध्रेत भारतीय बनावाटीचे फोन घेऊन अनेक भारतीय कंपन्या बाजारात उतरल्या. बघुयात भारतीय बाजारात भारतीय बनावटीच्या सध्या उपलब्ध असलेल्या फोन्सविषयी जाणून घेऊयात.

आयबॉल अँडी ५ क्यू गोल्ड फोरजी
भारतीय उत्पादक कंपन्यांमध्ये आणखी एका कंपनीचे नाव अग्रणीवर आहे ते म्हणजे आयबॉल. या कंपनीने अगदी लहान फोनपासून टॅबलेटपीसीपर्यंत विविध उत्पादनांची निर्मिती केली आहे. याच जोडीला कंपनी की-बोर्ड, स्पीकर अशा उत्पादनांची निर्मितीही करते. या कंपनीने आयबॉल अँडी ५क्यू गोल्ड फोरजी हा एक मोबाइल भारतीय बाजारात आणला आहे.
असा आहे हा फोन
डिस्प्ले – पाच इंच एचडी. ७२० बाय १२८० पिक्सेल रिझोल्युशन
रॅम – एक जीबी
रोम : सोळा जीबी
जोडणी : थ्रीजी, फोरजी, वायफान, जीपीएस
मुख्य कॅमेरा : आठ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा : पाच मेगापिक्सेल
प्रोसेसर : क्वाड कोर
ओएस : अँड्रॉइड लॉलिपॉप ५.१
मेमरी : ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
बॅटरी : २६८० एमएएच
किंमत : विविध ई-संकेतस्थळावर ३७९९ रुपयांपासून ६७९०पर्यंत उपलब्ध.

सेलकॉन डायमंड फोरजी प्लस
भारतीय मोबाइल उत्पादकांपैकी एक म्हणजे सेलकॉन. या कंपनीचे उत्पादन केंद्र हे तेलंगणामध्ये असून दरमाह तेथून दोन लाख फोन्सची निर्मिती केली जाते. देशातील फोनची मागणी लक्षात घेऊन कंपनीने चीनहून भारतात उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने एप्रिलच्या सुरुवातीलाच डायमंड फोरजी हा मोबाइल बाजारात आणला.

असा आहे हा फोन
डिस्प्ले – पाच इंच एचडी. ७२० बाय १२८०
पिक्सेल रिझोल्युशन
रॅम – एक जीबी
रोम : आठ जीबी
जोडणी : थ्रीजी, फोरजी एलटीई, वायफान, जीपीएस
मुख्य कॅमेरा : आठ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा : ३.२ मेगापिक्सेल
प्रोसेसर : क्वाड कोर
ओएस : अँड्रॉइड लॉलिपॉप ५.१
मेमरी : ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
बॅटरी : २२०० एमएएच
किंमत : विविध ई-संकेतस्थळावर ६२९९ रुपयांपासून उपलब्ध.

कार्बन क्वाट्रो एल 50 एचडी
भारतीय कंपनी कार्बनने दिल्लीतील जैना समुह आणि बंगळुरू येथील युएलटी समुह यांच्याशी सहकार्य करुन मोबाइल आणि टॅबलेट उत्पादन सुरू केले आहे. भारतात गुगलचा अँड्रॉइड वन हा मोबाइल आणणाऱ्या तीन कंपन्यांपैकी कार्बन एक आहे. आजच्या घडीला कार्बनही देशातील सर्वाधिक स्मार्टफोन बनविणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने जानेवारी महिन्यातच कार्बन क्वाट्रो एल ५० एचडी हा नवीन मोबाइल भारतीय बाजारात आणला. एचडी स्क्रीन हे या मोबाइलचे वैशिष्ठय़ मानले जाते.

असा आहे हा फोन

डिस्प्ले – पाच इंच एचडी. ७२० बाय १२८० पिक्सेल रिझोल्युशन
रॅम – दोन जीबी
रोम : सोळा जीबी
जोडणी : थ्रीजी, फोरजी एलटीई, वायफान, जीपीएस
मुख्य कॅमेरा : तेरा मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा : पाच मेगापिक्सेल
प्रोसेसर : १.३ गीगाहर्टझ ऑक्टा कोर
ओएस : अँड्रॉइड लॉलिपॉप ५.१
मेमरी : ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
बॅटरी : २६०० एमएएच
किंमत : 6819 रुपये.

इंटेक्स क्लाऊड ज्वेल
भारतीय बनावटीच्या फोन्समध्ये प्रामुख्याने बाजारात दिसणाऱ्या फोन्सपैकी एक म्हणजे इंटेक्स. त्यांच्या अ‍ॅक्वा या मालिकेला लोकांनी चांगली पसंती दिली. याचबरोबर इंटेक्सने क्लाऊड ही मालिकाही बाजारात आणली होती. या मालिकेतील क्लाऊड ज्वेल हा फोन मार्च महिन्यांच्या अखेरीस कंपनीने स्नॅपडील या ई-मार्केटिंग संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या फोनमध्ये फोरजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे देशात सध्या सुरू असलेल्या फोरजीच्या सेवांचा लाभ घेणे तुम्हाला शक्य होणार आहे.
असा आहे हा फोन
डिस्प्ले – पाच इंच एचडी आयपीएस
रॅम – दोन जीबी
रोम : सोळा जीबी
जोडणी : थ्रीजी, फोरजी, एलटीई
मुख्य कॅमेरा : आठ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा : दोन मेगापिक्सेल
प्रोसेसर : मीडिया टेक क्वाड कोर
ओएस : अँड्रॉइड लॉलिपॉप ५.१
मेमरी : ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
बॅटरी : २५०० एमएएच
किंमत : ५,९९९ रुपये.

झोलो एरा एक्स
लावा या आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतीय बाजारपेठेत झोलो उपकंपनीच्या मदतीने स्मार्टफोन आणले. यापैकी झोलो एरा एक्स हा फोन फेब्रुवारी महिन्यात बाजारात आणला आहे. या कंपनीच्या मोबाइलने स्वस्त आणि मस्त या फोनच्या माध्यमातून अल्पावधीतच भारतीय बाजारपेठेत नाव प्रस्थापित केले.

असा आहे हा फोन
डिस्प्ले – पाच इंच एचडी. ७२० बाय १२८० पिक्सेल रिझोल्युशन
रॅम : दोन जीबी
रोम : आठ जीबी
जोडणी : थ्रीजी, फोरजी, वायफान, जीपीएस
मुख्य कॅमेरा : आठ मेगापिक्सेल
फ्रंट कॅमेरा : पाच मेगापिक्सेल
प्रोसेसर : १.५ गीगाहर्टझ क्वाड कोर
ओएस : अँड्रॉइड लॉलिपॉप ५.१
मेमरी : ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते.
बॅटरी : २५०० एमएएच
किंमत : ५७७७ रुपये.
नीरज पंडित – niraj.pandit@gmail.com