12 August 2020

News Flash

‘साऊंड वन’च्या पॉवरबँक

‘३ यूएसबी पोर्ट’ पॉवरबँकच्या साह्याने एका वेळी तीन फोन चार्जिग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पॉवरबँक, जिओनीचा ‘ए१ लाइट, ‘कव्‍‌र्हड् टीव्ही’ , आयफोन

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘साऊंड वन’ या कंपनीने भारतात पॉवरबँकची काही उत्पादने दाखल केली आहेत. ऑडिओ तसेच वायरलेस कम्युनिकेशन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या हाँगकाँगस्थित ‘साऊंड वन’ने प्रथमच भारतात पॉवरबँक आणल्या आहेत. ‘डय़ुअल यूएसबी पोर्ट’ आणि ‘३ यूएसबी पोर्ट’ अशा स्वरूपात या पॉवरबँक आणण्यात आल्या असून आकाराने आकर्षक व वजनाने हलक्या असलेल्या या पॉवरबँकमध्ये एलईडी फ्लॅशलाइट टॉर्च तसेच लाइट इंडिकेटर पुरवण्यात आला आहे. या दोन्ही पॉवरबँक दहा हजार एमएएच क्षमतेच्या असून त्या कोणत्याही स्मार्टफोनला चालतील, असा कंपनीचा दावा आहे. यापैकी ‘डय़ूअल यूएसबी पोर्ट’ असलेल्या पॉवरबँकच्या साह्याने एका वेळी दोन तर ‘३ यूएसबी पोर्ट’ पॉवरबँकच्या साह्याने एका वेळी तीन फोन चार्जिग करण्याची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही पॉवरबँक ११९९ रुपये इतक्या किमतीला बाजारात उपलब्ध असून त्यावर एका वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे.

जिओनीचा ‘ए१ लाइट’

आधी ‘ए१’ आणि मग ‘ए१ प्लस’ स्मार्टफोन बाजारात आणून ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जिओनीने आता ‘ए१ लाइट’ या नवीन स्मार्टफोनची बाजारात भर घातली आहे. २० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आणि ४ हजार एमएएच क्षमतेची तगडी बॅटरी ही या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. फ्रंट कॅमेऱ्याला फ्लॅशची जोड देण्यात आल्याने अंधारातही सेल्फी काढणे शक्य होणार आहे. याशिवाय या फोनचा मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे. ५.३ इंची आकाराचा डिस्प्ले असलेला हा फोन हाताळण्यास सोपा आणि हातात धरण्यास आरामदायी आहे. या फोनची बॅटरी ३० तासांपर्यंत कार्यरत राहू शकते, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोअरेजमुळे या फोनची कार्यक्षमता वेगवान झाली आहे. या फोनची स्टोअरेज क्षमता २५६ जीबीपर्यंत वाढवताही येऊ शकते. जिओनीने हा फोन १४ हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला असून या किंमत श्रेणीतील अन्य स्मार्टफोनना ‘ए१ लाइट’ चांगली टक्कर देऊ शकतो. यासोबतच हा फोन खरेदी करणाऱ्या एअरटेलच्या ग्राहकांना सहा महिन्यांसाठी १० जीबी डेटा मोफत दिला जाणार आहे.

‘मिताषी’चा ‘कव्‍‌र्हड् टीव्ही’

मनोरंजन उत्पादन निर्मिती क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप पाडणाऱ्या मिताषी या कंपनीने ३२ इंच (८०.१ सेमी) आणि ३९ इंच (९७.७९ सेमी) आकाराचे ‘कव्‍‌र्हड् एलईडी टीव्ही’ भारतात दाखल केले आहेत. या टीव्हींची किंमत अनुक्रमे २७९९० रु. आणि ३९९९० रुपये इतकी आहे. दोन्ही टीव्ही ‘एचडी रेडी’ असून यामध्ये वायफाय, यूएसबी पोर्ट

तसेच कार्ड रीडरची सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा माध्यमातून टीव्हीवर आपले आवडते व्हिडीओ पाहणे वापरकर्त्यांना शक्य होणार आहे. याशिवाय यामध्ये ‘स्क्रीन मिररिंग’ची सुविधा असून त्याद्वारे तुम्ही स्मार्टफोनवर डिस्प्लेवर दिसणारे व्हिडीओ थेट टीव्हीवर पाहू शकता. या टीव्ही संचांना तीन वर्षांची वॉरंटी पुरवण्यात आली आहे.

आयफोनवर अँड्रॉइडही

‘येऱ्हा डॉट कॉम’(Yerha.com) या ई कॉमर्स संकेतस्थळाने ‘मेस्यूट’ ही आयफोनसाठीची डय़ूअल सिम केस बाजारात आणली असून या ‘केस’च्या मदतीने आयफोनवर अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम चालवता येणे शक्य होते. अशा प्रकारे आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम एकाच मोबाइलवर उपलब्ध करून देणारे हे पहिलेच तंत्रज्ञान आहे. ‘मेस्यूट’ हे असे उपकरण आहे ज्यात स्वत:चे मॉडेम असून या उपकरणाचे अ‍ॅप डाऊनलोड व इन्स्टॉल करावे लागते. अ‍ॅप इन्स्टॉल करून झाल्यानंतर ब्लूटूथ सुरू केल्यास तुमचा फोन एकाच वेळी आयफोन आणि अँड्रॉइड अशा दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करू शकेल. या उपकरणात दोन जीबी रॅम व १६ जीबी अंतर्गत स्टोअरेजची सुविधा पुरवण्यात आली आहे. या ‘केस’ची किंमत ९९९० रुपये असून ‘Yerha.com’च्या संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2017 12:49 am

Web Title: new gadgets available in market
Next Stories
1 फिरता संगणक
2 समाजमाध्यमे आणि सायबर सुरक्षा
3 दुहेरी कॅमेरा कशासाठी?
Just Now!
X