* मी संगणक शिकण्याचे अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड केले आहे. ते अ‍ॅप मला माझ्या लॅपटॉपवर पाहायचे आहे तर ते करता येऊ
शकते का? संतोष निरगुडे
* मोबाइलवर सध्या अनेक चांगले अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र हे सर्वच अ‍ॅप संगणकावर उपलब्ध आहेतच असे नाही. असे अ‍ॅप संगणकावर किंवा लॅपटॉपवर वापरता यावे अशी अनेकांची मागणी होती. ही मागणी दूर करण्यासाठी जागतिक आयटी हब म्हणून ओळख असलेल्या सिलिकॉन व्हॅली येथे ब्लूस्टॅक्स नावाची कंपनी सुरू झाली आणि त्यांनी ही गोष्ट शक्य केली आहे. क्लाऊड तंत्रज्ञाची मदत घेत कंपनीने हे शक्य केले आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संगणकावर http://bluestacks.com/ या संकेतस्थळावरून ब्लूस्टॅक्स अ‍ॅप प्लेअर डाऊनलोड करून घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या फेसबुक खात्यावरून किंवा सुरू असलेल्या ई-मेल खात्यावरून नोंदणी करावी लागेल. ही नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक ब्लूस्टॅक्स पीन येईल. हा पीन सेव्ह करून ठेवा. यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये ब्लूस्टॅक्स क्लाऊड कनेक्ट हे अ‍ॅप डाऊनलोड करा. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर मोअरमध्ये जाऊन अ‍ॅप सिंक टू पीसी हा पर्याय निवडा व त्या वेळेस तुम्हाला ब्लूस्टॅक्स पिन विचारला जाईल. हा पिन दिल्यावर तुमचा फोन आणि संगणक कनेक्ट होऊन तुम्हाला अ‍ॅप वापरता येईल.

special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?
It was seen in paris how a public toilet is being cleaned automatically
VIDEO: पॅरिसमध्ये अशाप्रकारे होते सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता; ‘हे’ खास तंत्रज्ञान आपल्याकडे कधी येणार?
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट