News Flash

टेक-नॉलेज : व्हीओएलटीई म्हणजे काय?

यामध्ये तुम्ही फोर केचा टीव्ही घ्यावा, कारण फुल एचडी आणि फोर के मध्ये पिक्सेलचा खूप जास्त फरक आहे.

technical knowledge
मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे

* सध्या सर्वत्र व्हीओएलटीईची चर्चा आहे. या तंत्रज्ञानाचा नेमका फायदा काय? 

– अमोल मुजुमदार, ठाणे

या वर्षांत सर्वाधिक चर्चा झाली ती रिलायन्य जिओची. यामध्ये वापरण्यात आलेले व्हीओएलटीई तंत्रज्ञान ही वैशिष्टय़पूर्ण बाब ठरली आहे. हे तंत्रज्ञान देशात दूरसंचार क्षेत्रात प्रथमच रिलायन्सने वापरले. या तंत्रज्ञानात तुम्हाला व्हॉइस कॉल आणि इंटरनेट अशा दोन्ही सुविधा वापरता येतात. या तंत्रज्ञानामुळे तुमच्या व्हॉइस कॉलचा वेग अधिक चांगला होतो, आवाजाचा दर्जाही वाढतो. तसेच कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाणही कमी होते.

* मला टीव्ही घ्यायचा आहे. तर मी फोर के किंवा फुल एचडीपैकी कोणता घेऊ यामध्ये मी गोंधळलो आहे. तर यापैकी कोणता घ्यावा.

समाधान शिरस्ते, औरंगाबाद

यामध्ये तुम्ही फोर केचा टीव्ही घ्यावा, कारण फुल एचडी आणि फोर के मध्ये पिक्सेलचा खूप जास्त फरक आहे. यामुळे  तुम्हाला चित्रांचा दर्जा फोर केमध्ये अधिक चांगला मिळू शकतो. फुल एचडीमध्ये १९२० बाय १०८० पिक्सेलचे रिझोल्यूशन असते तर हेच रिझोल्यूशन फोर केमध्ये ४००० बाय २१६० पिक्सेलचे मिळते. जेवढे पिक्सेल जास्त तेवढा चित्रांचा दर्जा चांगला असतो. यामुळे फोर केचा टीव्ही घेणे केव्हाही फायद्याचे ठरू शकते.

या सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com  वर लॉगइन करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2017 4:27 am

Web Title: technical question by readers
Next Stories
1 ‘शब्द’खेळ
2 साठवणुकीचा प्रवास
3 लॅप‘टॉप’
Just Now!
X