मला यूएसबी किंवा वायफाय डोंगल घ्यायचे आहे. कोणत्या कंपनीचे डोंगल घेणे फायदेशीर होईल? या डोंगलमध्ये मला जास्तीत जास्त स्टोअरेजही हवे आहे.   – सागर सावंत, विक्रोळी

डोंगल घेताना नेहमी एक काळजी घ्यायची, ती म्हणजे आपण जास्त वेळ हे डोंगल कुठे वापरणार आहोत? त्या ठिकाणी रेंज येते की नाही? तुम्ही आता वायफाय डोंगल घेतलेले चांगले. म्हणजे एकदा तुम्ही ते जोडले की चार ते पाच उपकरणे त्याआधारे इंटरनेटला जोडता येऊ शकतात. सध्या वायफाय डोंगल एअरटेल, डोकोमो अशा मोबाइल कंपन्या पुरवीत आहेत. तुमच्या गरजेनुसार कंपन्यांचे विविध प्लॅन्स उपलब्ध आहेत. सध्या रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांनी वायफाय सुविधा देणारे उपकरणही बाजारात आणले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून तुम्ही एका वेळी चार ते दहा मोबाइल्स, लॅपटॉप किंवा उपकरणे इंटरनेटशी जोडू शकता.

मेमरी कार्डमधून डिलिट झालेल्या फाइल्स कशा रिकव्हर करायच्या?   – संदेश  सुर्वे

डिजिटल कॅमेरा असो किंवा फोन, एक चुकीचे बटण दाबले गेले की तुमची माहिती डिलिट होते; पण ही माहिती रिकव्हर करण्याची सोयही उपलब्ध आहे. मेमरी कार्डमधील डिलिट झालेले फोटो रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम ते कार्ड कार्ड रीडरच्या साहाय्याने संगणकाला कनेक्ट करा. कार्ड कनेक्ट झाले की, http://www.cardrecovery.com/download.asp  कार्ड रिकव्हरीसाठी उपलब्ध असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डमधील डिलीट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आणि त्याच्या मदतीने माहिती पुन्हा रिकव्हर करून दिला जातो; पण यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.

मला माझे व्हॉट्सअ‍ॅपचे संदेश ई-मेल करायचे आहेत. कसे करता येतील?

 -किशोर नारगोळीकर, कल्याण</strong>

व्हॉट्सअ‍ॅपचे संदेश ई-मेलवर पाठविणे सोपे आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीचे किंवा ज्या ग्रुपवरचे संदेश ई-मेल करावयाचे आहेत त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे नाव तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर शोधा. त्यानंतर ते ओपन करून पर्यायामध्ये  जा. तेथे मोअरमध्ये जा. मग तुम्हाला ‘क्लिअर कन्व्हर्सेशन’, ‘ई-मेल कन्व्हर्सेशन’ आणि अ‍ॅट शॉर्टकट असे पर्याय येतील. यातील ‘ई-मेल कन्व्हर्सेशन’ हा पर्याय निवडून तुम्ही सर्व संवाद ई-मेल करू शकता.