दंग-तान हा शब्द आणि याचा अभिप्रेत अर्थ हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक आहात, याची मला खात्री आहे. अर्थात तरीही शीर्षक वाचून माझा लेख वाचायला घेतलेल्या तुम्हा सर्वाना मी एक सांगू इच्छितो. ते म्हणजे ही कुठली नवी भाषा नाही, कुठले नवे तंत्रज्ञान नाही. कुठलेही नवे सॉफ्टवेअर नाही. शिवाय कुठलीही चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी नाही.

गतवर्षी आपल्या बॉलीवूड चित्रपटांनी एक वेगळीच उंची गाठली म्आपण सगळेच त्याचे साक्षीदार आहोत. या पैकी काही राज्यांपुरत्या सीमित आणि तुलनेने कमी लोकप्रिय असलेल्या खेळांवर आधारित असलेले दोन चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेत. निश्चितपणे हे अनपेक्षित होते. कुस्तीवर आधारित ‘सुल्तान’ आधीच प्रदर्शित झाल्याने त्याच्या पाठोपाठ आलेला आणि कुस्तीचीच पाश्र्वभूमी असलेला ‘दंगल’ चालणार नाही, असेच सगळ्यांना वाटले होते. (‘दंग-तान’ या शब्दाची उकल तुम्हाला झाली असेल, अशी अपेक्षा करूयात) पण ‘दंगल’च्या यशाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हे दोन्ही सिनेमे केवळ विशिष्ट खेळाबद्दल नव्हते तर प्रसंग, व्यक्तिरेखेवर आधारित होते. या चित्रपटांची संवेदनशील व भावूक पाश्र्वभूमी प्रेक्षकांना भावली. येथे प्रतिसादक्षम तंत्रज्ञानाचा जन्म होतो. भावनिक कार्यक्षमतेच्या आधारावर वापरकर्ता अनुभवाचा प्रतिसाद देणारे आणि कमी खर्चात उच्च कार्यक्षमता देणारे तंत्रज्ञान म्हणजे प्रतिसादक्षम तंत्रज्ञान. आज डिजिटल आणि मार्केटिंग डोमेनमधील सीएक्सओमध्ये हे तंत्रज्ञान प्रभावी ठरतेय? ते का व कसे, हे आपण समजून घेऊयात.

आज आपल्याकडे असंख्य अ‍ॅप्स आहेत. आपल्या लॅपटॉप, स्मार्टफोन, डेस्कटॉप किंवा पी.ओ.एस.ओ.ओ.द्वारे मिळवलेले विविध सॉफ्टवेअर्स आहेत. या सगळ्या व्यासपीठांवरून वापरकर्त्यांला समान अनुभव मिळतो का? आपण सर्व चांगल्या ते वाईट अशा बारीकसारीक गोष्टींचे वर्गीकरण करतो. या पाश्र्वभूमीवर एखाद्या विशिष्ट अ‍ॅपनी ओएसवरील सॉफ्टवेअर इतरांपेक्षा आपल्याला अधिक भावते? त्याच्या मागे काय रहस्य आहे? का या मागे ब्रॅण्ड, विपणनसामग्री किंवा उत्पादन / संघटना / ब्रँड यांच्याद्वारे ‘फर्स्टमुव्हर’ दृष्टिकोन कारणीभूत आहे?

याचे उत्तर प्रतिसादक्षम तंत्रज्ञानाच्या व्याख्येत आहे जे आपण ‘भावनात्मक कार्यक्षमता’या कसोटीवर तपासून पाहिले होते. ‘दंग-तान’ (दंगल आणि सुल्तान) हे दोन्ही चित्रपट म्हणून रिलीज झालेत. प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी यात संबंधित भावनिक कार्यक्षमता अतिशय सुस्थापित पद्धतीने अमलात आणली गेली.

‘दंगल’ एक यशस्वी कुस्तीपटूच्या वास्तविक जीवनाची कथा आणि तिच्या वडिलांसोबतचे त्यांचे समीकरण यावर आधारित कथा होती. याउलट सुल्तानने महत्त्वाकांक्षी कुस्तीपटूच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केले.

तर या तथाकथित भावनिक क्षमता काय आहेत?  तंत्रज्ञानाच्या अभिव्यक्तीनुसार, मानवी भावना समजून घेणे आणि त्यात अधिक जलद सुधारणा करत निदरेषक्षमता विकसित करणे अभिप्रेत आहे. असा अनुभव पूर्ण करण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत.

* आपल्या तंत्रज्ञानाशी संबंधित वापरकर्त्यांचा उद्देश स्पष्ट करणे, समस्या विधान स्पष्ट असणे आवश्यक आहे. होय, सुपरस्टारसारखा तुमचा ब्रँड कदाचित मोठा आहे. तुमच्याकडेही चित्रपटाच्या अतिप्रगत नवीनतम तंत्रज्ञान आहे. विपणन साधने, ब्रान्डिंग, ट्रेलर आणि गाण्यासारख्या ब्रँडिंग युक्त्या आहेत; परंतु या उपरही तुम्ही चित्रपटाप्रमाणे उपयोगकर्त्यांला तुम्ही प्रभावित करू शकत नाही. तुम्हाला आठवत असेल तर, बॉलीवूडच्या तिसऱ्या खानचे (शाहरूख खान) गतवर्षी दोन चित्रपट रिलीज झालेत. यावर्षीही त्याचे काही चित्रपट येऊ  घातले आहेत. तथापि, त्याच्या चित्रपटाची कामगिरी तुम्हाला माहिती आहे. जोपर्यंत आपण मानवी भावनांना अनुरूप असे करणार नाही आणि त्यानुसार आपले तंत्रज्ञान तयार करत नाही तोपर्यंत वापरकर्ता अनुभव निराशाजनक होणार आहे.

* डिझाइन

‘दंगल’मध्ये गीता फोगटवर एखादे गाणे चित्रित केले गेले असते तर काय झाले असते? मला हे स्पष्ट करण्याची गरज नाही की, या अनावश्यक गाण्याने कथेचा प्रवाह, प्रेक्षकांशी साधलेला भावनिक बंध याला धक्का लागला असता, अगदी याच अनावश्यक गाण्याप्रमाणे वेबसाइट किंवा अ‍ॅप वापरायला क्लिष्ट वा जटिल असेल तर त्याचे परिणाम दुर्दैवी असतील. वापरकर्त्यांला ते अपील होणार नाही.

* कटिबद्धता

कदाचित सर्व डिजिटल आणि सामग्री व्यावसायिकांसाठी आज हा सर्वाधिक परवलीचा तेवढा सर्वात तापदायक शब्द ठरावा. पण आज यापासून कुणीच दूर पळू शकत नाही, हे सत्य आहे. लहान असताना आपल्याला बालकथा आवडतात. तारुण्यात आपण स्वत: कथा रचतो. पालक झाल्यावर या कथांच्या रूपातले अनुभव वाटतो आणि पुढे वृद्ध झाल्यावर याच कथा चघळत बसतो, हेसुद्धा एक वास्तव आहे. कथा सांगते ती कोणत्या प्रकारच्या प्रतिबद्धतेवर आधारलेली आहे आणि हे सांगणे अत्यावश्यक आहे की वापरकर्त्यांच्या अनुभवाचा अर्थ म्हणजे कथासंग्रहाशी संबंधित असणाऱ्या वापरकर्त्यांचा अनुभव आहे, अगदी तंत्रज्ञानाचाही त्यास विरोध होऊ  शकतो.

वापरकर्त्यांच्या गरजांबद्दल सहानुभूती बाळगा, संपूर्ण अनुभव डिझाइन करा आणि उच्च प्रतिबद्धता स्तर तयार करा – हे आपल्याला उत्तरदायी तंत्रज्ञानाच्या प्रदाता म्हणून सक्षम करेल जे दंग-तानसारख्या उत्कृष्ट वापरकर्त्यांच्या अनुभवासाठी भावनिक कार्यक्षमता तयार करतील!

– प्रसाद आजगावकर, मुख्याधिकारी, आयरिअ‍ॅलिटीज टेक्नॉलॉजी प्रा. लि.