05 March 2021

News Flash

टेकन्यूज : ट्विटरवरील ‘अवतार’ माणसात!

आतापर्यंत प्रोफाइल फोटो न ठेवणाऱ्या वापरकर्त्यांचा ‘प्रोफाइल पिक’ अंडय़ाच्या आकाराचा होता.

ट्विटरने वापरकर्त्यांच्या प्रोफाइल फोटोचा ‘डिफॉल्ट अवतार’ बदलला आहे.

‘चिमणी’चे प्रतीकचिन्ह घेऊन जगभरातील संवादाचे अतिशय महत्त्वाचे माध्यम बनलेल्या ट्विटरने अखेर वापरकर्त्यांच्या प्रोफाइल फोटोचा ‘डिफॉल्ट अवतार’ बदलला आहे. आतापर्यंत प्रोफाइल फोटो न ठेवणाऱ्या वापरकर्त्यांचा ‘प्रोफाइल पिक’ अंडय़ाच्या आकाराचा होता. परंतु ट्विटरने आता हा अवतार बदलून त्याला मनुष्याकृती पुरवली आहे. २०१०पासून ट्विटरवरील ‘डिफॉल्ट प्रोफाइल पिक’ अंडाकृती येत होते. एखाद्या अंडय़ातून पक्षी जसा बाहेर पडतो, आणि ‘ट्विट’ अर्थात ‘चिवचिव’ करतो, याचे प्रतीक म्हणून हे ‘अंडाकृती’ चिन्ह ठेवण्यात आले होते. मात्र आता कंपनीने ते बदलले आहे. ट्विटवरवरून वाढलेल्या ‘ट्रोल्स’शी (सदैव दुसऱ्याच्या ट्विट्सवर टीका वा प्रतिक्रिया करणारे वापरकर्ते) ही अंडाकृती अधिक जोडली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी ‘प्रोफाइल पिक’चा अवतार बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे समजते.

अमर्याद डेटाच्या शर्यतीत बीएसएनएल

अतिशय माफक दरात जास्तीत जास्त इंटरनेट डेटा पुरवून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याच्या खासगी मोबाइल कंपन्यांच्या पावलावर पाऊल टाकून केंद्र सरकारच्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’नेही (बीएसएनएल) ब्रॉडबॅण्ड इंटरनेटसाठी आकर्षक योजना जाहीर केली आहे. बीएसएनएलने आपल्या नवीन ब्रॉडबॅण्ड ग्राहकांसाठी दरमहा किमान २४९ रुपयांमध्ये दररोज १० जीबी इंटरनेट डेटा व अमर्यादित कॉलिंगचा पर्याय जाहीर केला आहे.

बीएसएनएलची ही योजना ३० जूनपर्यंतच सुरू राहणार आहे. इच्छुक ग्राहकांना बीएसएनएलच्या १८००३४५१५०० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून किंवा ‘बीएसएनएल’च्या ट्विटर हँडलवर आपली माहिती नोंदवून या योजनेचा लाभ घेता येईल.

देशातील मोबाइल व इंटरनेट सेवा कंपन्यांमध्ये अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पर्धा सुरू असताना, ‘बीएसएनएल’नेही यात उडी घेऊन ग्राहकांना चांगला पर्याय देऊ केला आहे. परंतु या योजनेला मर्यादा आहेत. ही योजना घेणाऱ्या ग्राहकांना २ एमबी प्रति सेकंद इतक्या अल्प वेगाने इंटरनेट वापरता येणार आहे. याशिवाय अमर्यादित कॉलिंगची सुविधा रात्री ९ ते सकाळी ७ पर्यंतच वापरता येणार आहे. रविवारच्या दिवशी मात्र दिवसभर अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध राहील.

सध्या ब्रॉडबॅण्ड इंटरनेटच्या क्षेत्रात खासगी कंपन्या ग्राहकांना सरासरी ५.६६ एमबी प्रति सेकंद असा इंटरनेट वेग उपलब्ध करून देत असताना बीएसएनएलने आपला इंटरनेट वेग दोन एमबीपीएसपुरताच मर्यादित ठेवल्याने या योजनेकडे जास्त ग्राहक आकर्षित होण्याची शक्यता धूसर आहे. परंतु ग्रामीण भागात, जिथे अजूनही खासगी कंपन्यांचे जाळे विस्तारलेले नाही, त्या ठिकाणी ही योजना अतिशय उपयुक्त ठरू शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 1:21 am

Web Title: twitter changes default profile image from an egg to human
Next Stories
1 अनावश्यक ‘अनुस्मारकां’ना अलविदा
2 ‘व्हॉट्सअ‍ॅप’ नवे काय?
3 गॅजेट्सची सोनेरी दुनिया
Just Now!
X