14 December 2017

News Flash

टेकन्यूज : ‘व्हीयू’चा स्मार्ट अ‍ॅप्लिकेशनयुक्त पॉप स्मार्ट टीव्ही

पॉप स्मार्ट टीव्ही बाजारात व्हीयू टेलिव्हिजनने बाजारात आणला आहे.

लोकसत्ता टीम | Updated: September 19, 2017 2:49 AM

पॉप स्मार्ट टीव्ही बाजारात व्हीयू टेलिव्हिजनने बाजारात आणला आहे.

तरुण पिढीला आकर्षित करणारा, विविध स्मार्ट अ‍ॅप्लिकेशन असलेला पॉप स्मार्ट टीव्ही बाजारात व्हीयू टेलिव्हिजनने बाजारात आणला आहे. यासोबतच ऑफिस स्मार्ट व प्रीमिअम स्मार्ट टीव्ही हे खास वैशिष्टय़पूर्ण टीव्ही या कंपनीतर्फे बाजारात आणले गेले आहेत. या टीव्हीचे संशोधन व उत्पादन भारतात करण्यात आले असून या स्मार्ट टीव्हीमध्ये यूटय़ूब, यप्पटीव्ही, हंगामा, एरॉस व इतर अ‍ॅप्लिकेशनचा समावेश आहे. यापैकी पॉप स्मार्ट टीव्हीची किंमत त्यातील उत्पादन वैशिष्टय़ांनुसार अनुक्रमे २२ हजार, ३७ हजार ५०० व ४५ हजार ५०० रुपये अशी आहे. तर प्रीमिअम स्मार्ट टीव्हीची किंमत २० हजार, ३१ हजार ५००, ३८ हजार ५००, ४४ हजार ५०० आणि ६० हजार अशी आहे.

गुगलचे ऑफलाइन ट्रान्स्लेटर

गुगल ट्रान्सलेटरमध्ये मराठी भाषांतर करण्यासाठी आता इंटरनेटची गरज नाही. गुगल ट्रान्सलेटरने नव्याने उपलब्ध केलेल्या ऑफलाइन सेवेद्वारे मराठीत भाषांतर करणे शक्य होणार आहे. यासाठी इंटरनेट उपलब्ध असताना ट्रान्सलेट अ‍ॅपवरील आपल्याला हव्या असलेल्या भाषेतील पॅक डाऊनलोड करून घ्यावा लागेल. ट्रान्सलेट अ‍ॅप ओपन करा, हवी असलेली भाषा निवडा आणि डाऊनलोडच्या बटणावर टॅप करा. ऑफलाइन असताना, दोन भाषांमधील अनुवादाची सेवा घेण्यासाठी दोन्ही भाषांचे पॅक डाऊनलोड करण्याची आवश्यकता आहे.

त्याचबरोबर गुगलने व्हिज्युअल ट्रान्सलेशनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये गुगलने ‘कॉन्व्हर्सेशन मोड’ हे फीचर यात दिले आहे. यामुळे वापरकर्ते गुगल ट्रान्सलेट अ‍ॅपच्या माध्यमातून दुसऱ्या भाषेतील व्यक्तीशी संवाद साधू शकतात. त्याकरिता फक्त माइकवर टॅप करून निवडलेल्या भाषेत बोलायचे आहे, त्यानंतर पुन्हा माइकवर टॅप करायचे आहे. गुगल ट्रान्सलेट अ‍ॅप आपोआप कोणत्या दोन भाषांमध्ये संभाषण झाले हे ओळखून भाषांतर करेल.

या अ‍ॅपवर कॅमेरा वापरण्याचीही सुविधा आहे. इंग्रजीमधील शब्दाचे छायाचित्र काढून मराठीमध्ये त्याचा अनुवाद करून घेता येईल. यासाठी वर्ल्ड लेन्स फीचरचा समावेश करण्यात आला आहे. याच्या आधारे, मराठी बोलणारे नागरिक आपल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या शब्दाचे भाषांतर करून घेऊ  शकतात. याचा वापर करून परदेशात रस्त्यांची नावे, हॉटेलमधील मेन्यू कोणत्याही भाषेत समजून घेऊ  शकतात.

पेटीएम मॉलचा ‘कॅशबॅक सेल’

पेटीएम ईकॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पेटीम मॉलने २० ते २३ सप्टेंबर या कालावधीत उत्सवाच्या पहिल्या हंगामात चार दिवसांचा ‘मेरा कॅशबॅक सेल’ जाहीर केला आहे. कंपनी ग्राहकांना ५०१ कोटी रुपयांचा निश्चित कॅशबॅक देणार आहे. या सेलदरम्यान भेटवस्तू, उपकरणे, मोबाइल आणि फॅशन, कपडे, पादत्राणे आणि सामान यांच्या खरेदीवर १५% ते १००% कॅशबॅक मिळेल. याव्यतिरिक्त, दररोज २५ मोबाइलवर १००% कॅशबॅक देण्यात येणार आहे आणि २०० ग्राहकांना प्रत्येक दिवशी १०० ग्राम पेटीएम गोल्ड प्राप्त होईल. उत्सवांच्या पाश्र्वभूमीवर हा सेल जाहीर करण्यात आला असून याला ग्राहकांचे उत्तम सहकार्य लाभेल असे पेटीएम मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिन्हा यांनी सांगितले.

First Published on September 19, 2017 2:49 am

Web Title: vu launches brand new smarttv
टॅग SmartTV