आजच्या काळात ई-मेल अकाऊंट हॅक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातही गुगलचे ‘जी-मेल’ हे स्मार्टफोनसह अन्य उपकरणांवरून हाताळण्यात येत असल्याने जी-मेल खात्यातील घुसखोरी सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. पण याखेरीज मोठमोठय़ा कंपन्यांच्या ई-मेल सव्‍‌र्हरमध्ये शिरून त्यांचे अकाउंट हॅक करून त्यांची वैयक्तिक तसेच कार्यालयीन माहिती चोरण्याचे प्रकारही हल्ली वाढू लागले आहेत. ‘जी-मेल’ पुरते बोलायचे झाल्यास आपले अकाउंट हॅक होऊ नये, यासाठी वापरकर्त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. या सुविधांच्या मदतीने तुम्ही तुमचे जी-मेल खाते हॅक होण्यापासून वाचवू शकता, तसेच ते हॅक झाले आहे का, याची खातरजमाही करू शकता.

कसे तपासावे ?

जी-मेल ओपन केल्यावर दिसणाऱ्या विंडोच्या खाली उजव्या बाजूला डिटेल्स असे लिहिलेले दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यावर  एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये अलीकडील १० वेब सत्राचा तक्ता दिसेल त्यात कोणत्या वेब ब्राऊसरवरून कोणत्या आय पी अ‍ॅड्रेसवरून कुठल्या वेळी तुमचा जी-मेल वापरला गेला आहे, याची संपूर्ण  माहिती मिळेल. आणि विंडोच्या वरच्या बाजूला ‘साइन आऊट फ्रॉम ऑल अदर सेशन्स’ असा पर्याय असेल त्यावर क्लिक करून तुम्हाला इतर ठिकाणी सुरू असलेले जी-मेल लॉगऑऊट येईल. तसेच संशयास्पद वाटणाऱ्या क्रिया या लाल शब्दांमध्ये दर्शविल्या जातील त्यानंतर तुम्ही तुमच्या जी-मेलच्या पासवर्डमध्ये इथे बदल करू शकता.