News Flash

वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’

वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’एखाद्या गोष्टीची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी काही बदल केले जातात.

वेबब्राउजर्सचे ‘बाहुबली’एखाद्या गोष्टीची उपयुक्तता वाढवण्यासाठी त्यामध्ये वेळोवेळी काही बदल केले जातात. ‘ट्रान्सफॉर्मर’ सिनेमातला ऑप्टिमस प्राइम माहित्येय का? तर या सिनेमाच्या दुसऱ्या भागात ऑप्टिमसला ताकदवान आणि अधिक सुसज्ज बनवण्यासाठी दुसरा एक रोबोट त्याला आपले पार्ट्स देतो. प्राइम अधिक चांगल्या प्रकारे प्रतिकार वगैरे करू लागतो. हे सिनेमाच्या बाबतीत झालं. माणसाचेच उदाहरण द्यायचे झाले तर स्वत:ची उपयुक्तता वाढवण्यासाठी विविध कौशल्य अंगीकारणे महत्त्वाचे ठरते. प्रत्येक टप्प्यावर तो तसे करत असतो. ‘वेबब्राउजर्स’च्या बाबतीत त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी ‘प्लग इन्स’ असतात. ही प्लग इन्सच कुठल्याही ब्राउजरला एक वाढीव वैशिष्टय़ प्राप्त करून देतात.

कुठलाही वेबब्राउजर डाउनलोड केला की त्यामध्ये काही फीचर्स बाय डिफॉल्ट असतात. त्यानुसार त्याचं कामकाज सुरू असतं. ‘प्लग इन’ म्हणजे असं सॉफ्टवेअर ज्यामुळे एखाद्या प्रोग्रामला किंवा अ‍ॅप्लिकेशनला वाढीव गोष्टी, प्रोग्राम्स चालवता येतात. उदाहरणार्थ ‘अ‍ॅडोब फ्लॅश प्लेअर’. या ‘प्लग इन’चं नोटिफिकेशन आपण अनेकदा पाहिलेलं आहे. फ्लॅश प्लेअर नसेल तर व्हिडीओ असणाऱ्या वेबसाइट्सवरचे व्हिडीओ दिसत नाहीत. त्यामुळेच वेबब्राउजर डाउनलोड केला की बहुतांश वेळा फ्लॅश प्लेअरचा प्लग इन इन्स्टॉल करण्याची परवानगी लगेचच मागितली जाते. इंटरनेटवर सध्याच्या घडीला अनेक प्लग इन्स उपलब्ध आहेत. सोशल मीडिया नेटवर्किंगसाठी, परदेशी भाषा शिकण्यासाठी किंवा त्यातली मुळाक्षरे टाइप करण्यासाठी, इमेल्सच्या सुरक्षेसाठी प्रेटी गुड प्रायव्हसी किंवा पीजीपी हा प्लग इन लोकप्रिय आहे. इतकेच नाही तर मायक्रोसॉफ्ट ऑफिसची डॉक्युमेंट्स ब्राउजरमध्येच पाहता यावीत यासाठीही काही प्लग इन्स उपलब्ध आहेत.

मुळातच प्लग इन्स हे अ‍ॅप्लिकेशन किंवा वेबब्राउजरसोबतच काम करतं. प्लग इन स्वतंत्रपणे एकटय़ाने असे काम करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे प्लग इन्स किंवा छोटे छोटे प्रोग्राम्स हे कुठलाही डेव्हलपर लिहू शकतो. त्यामुळे अ‍ॅप्लिकेशन्स जशी बाजारात येतात तशी त्यांना पूरक असे प्लग इन्स किंवा अ‍ॅडऑन्सही तयार होतात.

  • प्लग इनची गरज आहे का?

ब्राउजरवरून वेगवेगळ्या वेबसाइट अ‍ॅक्सेस करताना कधी कधी प्लग इन इन्स्टॉल करण्याचे नोटिफिकेशन येते. हे प्लग इन इन्स्टॉल करणे कधीही फायदेशीर असते. अर्थात इन्स्टॉल करण्याआधी त्या प्लग इनची आपल्याला गरज आहे का हे तपासून बघा. गरज असेल तरच इन्स्टॉल करा. कारण प्रत्येक प्लग इन हे त्या ब्राउजरची किंवा अ‍ॅप्लिकेशनची साइज वाढवत असते. त्यामुळे जितके जास्त प्लग इन्स तितकी ब्राउजरची किंवा अ‍ॅप्लिकेशनची साइज अधिक. सामान्यत: ब्राउजर किंवा अ‍ॅप्लिकेशन्सची साइज कमी ठेवण्यासाठी त्यात काही फीचर्स मुद्दामहून टाकले जात नाहीत. हेच फीचर्स प्लग इन्सच्या किंवा अ‍ॅडऑन्सच्या माध्यमातून नंतर टाकले जातात.

  • प्लग इन्स कसे अ‍ॅड करायचे?

१. ब्राउजरच्या सेटिंग्जमध्ये जा.

२. अ‍ॅडऑन्स नावाचा ऑप्शन त्यामध्ये दिसेल, त्यावर क्लिक करा.

३.  त्यामध्ये प्लग इन्स, अ‍ॅडऑन्स, एक्स्टेन्शन, युजर स्क्रिप्ट, अपिअरन्स, सव्‍‌र्हिसेस असे पर्याय असतात.

४.  त्यामधील प्लग इन्स किंवा अ‍ॅडऑन्सवर क्लिक करा.

५. आपल्याला हव्या असणाऱ्या प्लग इनबाबत सर्च करा आणि ते इन्स्टॉल करा.

  • अ‍ॅडऑन आणि प्लग इनमधील फरक

प्लग इन हा एक पूर्ण प्रोग्राम असतो. तर अ‍ॅडऑन हे एक फंक्शन असतं जे अ‍ॅप्लिकेशन किंवा वेबब्राउजरची उपयुक्तता वाढवते. मुख्य फरक म्हणजे अ‍ॅडऑन्स हे सामान्यत: फक्त वेबब्राउजरशीच संबंधित असतात. प्लग इन्स हे अ‍ॅप्लिकेशन्स आणि वेबब्राउजर दोन्हीसाठी वापरले जाते.

  • धोका काय?

अनेकदा प्लग इन्सच्या नावाखाली व्हायरस किंवा मालवेअर्स शेअर केले जातात. एखादं अ‍ॅडऑन इन्स्टॉल करण्याचे नोटिफिकेशन वेबसाइट देते आणि न बघता किंवा नकळत ओकेवर क्लिक करतो. त्यामुळे एखाद्या प्लग इनचे नोटिफिकेशन आले की त्याची नीट शहानिशा करूनच ते इन्स्टॉल करावे.

  • प्लग इन्सचे प्रकार

ऑडिओ : साउंड किंवा म्यूझिकशी संबंधित अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. अशा वेबसाइट्सवर म्यूझिक बनवणं, एडिट करणं, ऐकणं, डाउनलोड करणं अशा सुविधा असतात. अशा वेळी ऑडिओ एडिटर्ससाठी साउंड बनवणं, प्रोसेस करणं तसंच त्याचं पृथ:क्करण करण्यासाठी काही प्लग इन्स वापरावे लागतात. आरडॉर किंवा ऑडॅसिटी ही त्याची उदाहरणं आहेत.

मीडिया प्लेअर्स : विविध प्रकारचे व्हिडीओज चालवण्यासाठी तसेच फॉरमॅट्सना सपोर्ट करण्यासाठी विनअ‍ॅम्प, जीस्ट्रीमरसारखे प्लग इन्स वापरले जातात.

इमेल्स : वर सांगितल्याप्रमाणे इमेलच्या सिक्युरिटीसाठी प्रेटी गुड प्रायव्हसी हे प्लग इन मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते.

वेबब्राउजर : ब्राउजर्सच्या संदर्भात एक्स्टेन्शन्स वापरली जातात जी ब्राउजरची उपयुक्तता वाढवतात. अ‍ॅडोब फ्लॅश प्लेअर, क्विकटाइम, मायक्रोसॉफ्ट सिल्वरलाइट ही त्याची काही उदाहरणं आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2016 1:35 am

Web Title: what is a web browser
Next Stories
1 ‘ई वाचनानंद’
2 कूपन ‘भेट’
3 कलाकारांना ‘सर्च’ करण्याचा  धोका!
Just Now!
X