चिनी स्मार्टफोन कंपनी शिओमीने भारतातील त्यांचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi5 ची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. भारतात २४,९९९ रुपयांना मिळणारा हा फोन आता २२,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल. शिओमी इंडियाचे प्रमुख मनु जैन यांनी ही माहिती मंगळवारी त्यांच्या टि्वटर खात्यावर पोस्ट केली. ऑनलाइन खरेदी-विक्री संकेतस्थळ फ्लिपकार्ट आणि शिओमीचे अधिकृत संकेतस्थळ mi.com वरून या फोनची खरेदी करता येईल. असे असले तरी अद्याप नवीन किंमती या संकेतस्थळावर अपडेट करण्यात आलेल्या नाहीत. शिओमीने चिनी बाजारात आधीपासूनच या स्मार्टफोनची किंमत २०० युआन (जवळजवळ २००० रुपये) इतकी कमी केली आहे.

Mi 5 ची वैशिष्ट्ये

शिओमी एमआय ५ हा ड्युअल सिम फोन असून, यात ५.१५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. शिओमीचा हा पहिला फोन आहे ज्यात फिजिकल होम बटणाबरोबर फिंगरप्रिंट सेंन्सर देण्यात आला आहे. एड्रेनो ५३० जीपीयूसह क्वालकॉम स्नॅपड्रेगोन ८२० प्रोसेसर असून, फेस डिटेक्शन ऑटोफोकस, एलईडी फ्लॅश, सोनी आईएमएक्स २९८ कॅमेरा सेंसरने युक्त १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ४ के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट, ३००० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून, ही बॅटरी क्वालकॉम क्विक चार्ज ३.० टेक्नॉलोजीला सपोर्ट करते, १२९ ग्रॅम वजन असलेला हा फोन काळ्या, पांढऱ्या आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे.

व्हिडिओमध्ये फोनचा स्मार्ट लूक पाहा –