अलीकडच्या काळात इंटरनेटवरून व्यक्त होण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारखी समाज व्यासपीठेही कमी पडू लागली आहेत. अशा वेळी स्वत:चे संकेतस्थळ विकसित करण्याचा पर्याय निश्चितच उपयुक्त ठरू शकतो.

आपले कौशल्य, कला जगासमोर मांडली जावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. कुणाचा छायाचित्रणात हातखंडा असतो तर कुणी व्यंगचित्रे रेखाटत असतो, कुणाहाती लेखनकौशल्य असते तर कुणाला आपले विचार जनमानसांत पोहोचवायचे असतात. याशिवाय पाककला, शिवणकला, पर्यटन, अभ्यास, खेळ अशा विविध क्षेत्रातील आपला अभ्यास आणि विचार जगासमोर मांडून त्यातून समाजप्रबोधन घडवण्याची किंवा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा प्रत्येकामध्ये असतेच. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सार्वजनिक करताही येते. परंतु, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्राम या माध्यमांनाही मर्यादा आहेत. अशा वेळी आपली कलाकौशल्ये एकाच व्यासपीठावरून मांडण्यासाठी स्वत:चे संकेतस्थळ विकसित करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

स्वत:चे संकेतस्थळ ही कल्पना काही वर्षांपूर्वीपर्यंत कठीण आणि प्रचंड गुंतागुंत असलेली अशी होती. त्यासाठी ‘प्रोग्रॅमिंग लँग्वेज’ समजून घ्यावी लागत होती, ‘एचटीएमएल’ कोड माहीत करून घ्यावे लागत होते. संकेतस्थळ निर्मितीसाठी येणारा आर्थिक खर्चही जास्त होता. परंतु, आता संकेतस्थळ तयार करणे हे एखाद्या ईमेलसाठी ‘साइनअप’ करण्याइतके सोपे आहे. इंटरनेटवर सध्या अनेक ‘टूल्स’ उपलब्ध आहेत, ज्यायोगे तुम्ही स्वत: अगदी सुट्टीच्या एका दिवसात स्वत:चे संकेतस्थळ विकसित करू शकता.

संकेतस्थळ विकसित करताना..

‘साइटमॅप’ तयार करा – ‘साइटमॅप’ हा कोणत्याही संकेतस्थळाची सुची असते. तुमच्या संकेतस्थळावर काय काय असणार आहे, याची ती एक यादी असते. तसेच संकेतस्थळाची रचना कशी असेल, वेबपेज एकमेकांशी कसे जोडले गेलेले असतील, याचा तपशील म्हणजे ‘साइटमॅप’ होय.

‘साइटमॅप’ बनवून देणारे अनेक ‘टूल्स’ ऑनलाइन उपलब्ध आहेत. WriteMaps सारख्या ‘साइटमॅपिंग’ टूल्सच्या साह्याने तुम्ही जास्तीतजास्त तीन साइटमॅप विनाशुल्क तयार करू शकता. त्यासाठी WriteMaps च्या संकेतस्थळावर रजिस्टर करताच तुम्हाला ३० सेकंदाचा एक व्हिडीओ पाहून याबाबतची संपूर्ण माहिती मिळू शकेल. तुमच्या संकेतस्थळाचा ‘साइटमॅप’ एखाद्या वृक्षासारखा असेल. ज्यात मुख्य पानातून फुटत गेलेल्या वेबपेजेसच्या शाखा तुम्हाला दिसतील. ‘साइटमॅप’ तयार झाल्यानंतर त्यावरील कोणत्याही वेबपेजच्या लिंकसमोर क्लिक करताच तुम्ही नवीन वेबपेज तयार करण्यास सुरुवात करू शकता.

‘WriteMaps वर तुम्ही विविध वेबपेजची लेबल्स तयार करू शकता. पण या वेबपेजना रंग किंवा त्यात विशेष नोंदी करायच्या असतील तर, WriteMaps सारख्या सॉफ्टवेअरचा वापर तुम्ही करू शकता.

छायाचित्रे निवडा – तुमच्या संकेतस्थळावर मजकुराचा भरणा अधिक असला तरी तुम्हाला ते आकर्षक बनवण्यासाठी त्या मजकुराशी संबंधित छायाचित्रे जोडावी लागतील. अशी छायाचित्रे संकेतस्थळावर दाखल करण्याआधी त्यांचे ‘एडिटिंग’ ही आवश्यक प्रक्रिया आहे. याचसाठी WriteMapsl हे ‘फोटो एडिटर’ तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल. नवख्यांपासून जाणत्यांपर्यंत कुणालाही सहज हाताळता येईल, असे हे ‘फोटोएडिटर टूल’ आहे. तुम्ही त्याद्वारे तुमची छायाचित्रे ‘एडिट’ करू शकता. संकेतस्थळासाठी छायाचित्रे जोडताना शक्यतो ती ‘जेपीजी’ असावीत.

तुमच्या मजकुरासाठी योग्य छायाचित्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला Freemindl या संकेतस्थळावरून ती सहज उपलब्ध होतील.

‘होस्ट’ ठरवा – तुमच्या संकेतस्थळाच्या जडणघडणीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तुमचे संकेतस्थळ कोणत्या कंपनीकडून ‘होस्ट’ अर्थात सांभाळले जाईल, हे निवडणे अत्यावश्यक आहे. या कंपनीच्या माध्यमातून तुमच्या संकेतस्थळाला एक नाव मिळेल व ‘अ‍ॅड्रेस’ही मिळेल. शिवाय त्याची क्षमता किती असेल, त्यावर किती जण भेट देतील हे सगळे पाहून तुम्हाला ‘होस्ट’ ठरवावा लागेल. अनेक कंपन्या अगदी ९९ रुपये प्रति महिना या दरापासून शेकडो रुपये यासाठी आकारतात व त्याबदल्यात जास्त ‘स्पेस’, अँटिव्हायरस सुरक्षा पुरवतात. पण तुम्ही ‘ही kPixabayl kFreeGreenHostl, kWixl अशा मोफत यजमानपद भूषवणाऱ्या संकेतस्थळांच्या मदतीने विनाशुल्क संकेतस्थळ प्रसिद्ध करू शकता.

‘वेबपेज’ तयार करा – तुम्ही ‘होस्टिंग’ची प्रक्रिया पूर्ण केल्यावर संबंधित ‘होस्ट’ कंपनीकडून तुम्हाला ‘वेबपेज’ तयार करण्याचे ‘टूल’ पुरवले जाते. याआधारे तुम्ही सहज ‘वेबपेजेस’ तयार करू शकता.

‘डोमेन’ घेऊन सज्ज व्हा – तुमच्या संकेतस्थळावर ‘एचटीएमएल पेजेस’, छायाचित्रे किंवा अन्य फाइल अपलोड करण्यासाठी तुम्हाला ‘एफटीपी क्लायंट’ (फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल) सॉफ्टवेअर वापरावे लागेल. ‘वेबसाइट’ बनवणाऱ्या कंपन्या स्वत:च असे ‘एफटीपी क्लायंट’ पुरवतात. त्यामुळे याबाबतीत तुम्हाला फारशी डोकेफोड करावी लागणार नाही. याखेरीज तुम्हाला एक ‘डोमेन नेम’ (डॉट कॉम, डॉट नेट इ.) मिळेल. त्याचा वापर करून तुम्ही तुमचे संकेतस्थळ प्रसिद्ध करू शकता.

– प्रतिनिधी