वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा त्वरित वापर करत आज सर्वच कंपन्यांमध्ये अत्याधुनिक कॅमरे रोजच्या रोज बाजारात आणण्याची चढाओढच सुरू आहे. कॅनननेदेखील नुकतंच पॉवरशॉट जी सीरिजमध्ये जी फाइव्ह एक्स आणि नाइन एक्स असे दोन नवीन कॅमेरे बाजारात आणले आहेत. लाँच केले आहेत. या दोन्ही कॅमेऱ्यांमध्ये कॅननचे अद्ययावत इमेजिंग तंत्रज्ञान वापरले आहे. तसंच यात असलेल्या १.२ इंच आणि २०.२ मेगापिक्सेल सीएमओएस सेन्सरमुळे फोटो आणखी दर्जेदार येऊ शकतो. पॉवरशॉट जी सीरिजमधून मिळणाऱ्या छायाचित्राचा दर्जा हा डीएसएलआरच्या तोडीचा असल्याचा कंपनीचा दावा आहे.
फोटोग्राफर्सना उपलब्ध प्रकाशाच्या कमी-जास्त तीव्रतेनुसार छायाचित्रण करण्यासाठी कॅननने उच्च दर्जाचा सीएमओएस सेन्सॉर, डिजीक ६ इमेज प्रोसेसर कॅननची हाय-सेन्सेटीव्हिटी सिस्टीम (एचएस-HS) उपलब्ध केली आहे. पॉवरशॉट जी फाइव्ह एक्स आणि पॉवरशॉट जी नाइन एक्स या दोन्ही कॅमेऱ्यांनी कमी प्रकाश असलेल्या ठिकाणीदेखील उत्तम दर्जाचे फोटो काढता येतात. कॅमेऱ्यामधील फोटो आणि व्हिडीओजची देवाणघेवाण कधीही, कुठेही करता येऊ शकेल अशी वैशिष्टय़े आहेत. पॉवरशॉट जी फाइव्ह एक्सची किंमत रु. ४९,९९५/-, तर पॉवरशॉट जी नाइन एक्सची किंमत रु. ३२,९९५/- इतकी आहे.

पॉवरशॉट जी नाइन एक्सची वैशिष्टय़ं :
डायमेन्शन्स : साधारण ९८.० x ५७.९ x ३०.८ मिमी.
बॅटरी टाइप : एनबी-१३ एल
वजन :२०९ ग्रॅ.
लेन्स : ३ एक्स ऑप्टिकल झुम आयएस
इमेजिंग प्रोसेसर : डिजीक ६
फोकल लेंग्थ :२८-८४ मिमी. (३५ मिमी इक्विव्हॅलंट)
मॅक्झिमम व्हिडीओ फॉरमॅट : फूल एचडी १०८०पी
अ‍ॅपर्चर : f/2.0-f/4.9
मॅक्झिमम व्हिडीओ क्वालिटी : फूल एचडी २४पी/ २५पी/ ३०पी/ ५०पी/ ६०पी
एसीडी : ३’’ (साधारण १.०४ मिलिअन डॉट्स)
कनेक्टिव्हिटी : वाय-फाय, एनएफसी
इमेज सेन्सॉर : २०.२ मेगापिक्सेल १-इंच टाइप सीएमओएस सेन्सॉर

पॉवरशॉट जी फाइव्ह एक्सची वैशिष्टय़े:डायमेन्शन्स : साधारण ११२.४ x ७६.४ x ४४.२ मिमी.
इमेज सेन्सॉर : २०.२ मेगापिक्सेल १-इंच टाइप सीएमओएस सेन्सॉर
वजन : ३७७ ग्रॅ.
इमेजिंग प्रोसेसर : डिजीक ६
लेन्स : ४.२ एक्स ऑप्टिकल झुम आयएस
मॅक्झिमम व्हिडीओ फॉरमॅट : फुल एचडी १०८० पी
फोकल लेंग्थ :२४-१०० मिमी. (३५ मिमी इक्विव्हॅलंट)
मॅक्झिमम व्हिडीओ क्वालिटी : फूल एचडी २४ पी/ २५पी/ ३०पी/ ५०पी/ ६०पी
अ‍ॅपर्चर : f/1.8-f/2.8
ईव्हीएफ : साधारण ०.३९-इंच. २.३६ मिलिअन डॉट्स
एसीडी : ३’’ (साधारण १.०४ मिलिअन डॉट्स) वारी अँगल टच पॅनेल
कनेक्टिव्हिटी : वाय-फाय, एनएफसी
बॅटरी टाइप : एनबी-१३ एल

एलजी स्पिरिट एलटीई आणि एलजी जी फोर स्टायलस
फोर जीला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विविध कंपन्या एकापेक्षा एक आधुनिक स्मार्टफोन बाजारात आणताना दिसत आहेत. याचंच ताजं उदाहरण म्हणजे एलजीचे आगामी फोर जी हँडसेट. गेल्या महिन्यात एलजी इलेक्ट्रॉनिक्सने एलजी स्पिरिट एलटीई आणि एलजी जीफोर स्टायलस हे फोर जी हँडसेट भारतात आणण्याचे जाहीर केले. या फोर जी हँडसेटमध्ये व्हीओएलटीई (VoLTE) म्हणजे ‘व्हॉइस ओव्हर लाँग टर्म इव्होल्युएशन’ आणि व्हीओवाय-फाय (VoWi-Fi ) म्हणजे ‘व्हॉइस ओव्हर वाय-फाय’ ही वैशिष्टय़ं आहेत. या वैशिष्टय़ांमुळे इंटरनेटच्या साहाय्याने हायस्पीड संभाषण होऊ शकतं. देशभरातील विविध ब्रॅण्डेड दुकानांमध्ये हे हँडसेट उपलब्ध असतील.
व्हीओएलटीई ही सुविधा आयपी मल्टीमीडिया सबसिस्टीम नेटवर्कवर आधारित असून त्यातून ग्राहकांना व्हॉइस सव्‍‌र्हिसची सेवा उपलब्ध होणार आहे. (This approach results in delivery of voice just as the data flows within the LTE data bearer, which in turn implies that there is no dependency on legacy circuit switch voice networks to be maintained.)
व्हीओएलटीईमुळे आवाज आणि इंटरनेटची क्षमता थ्रीजी नेटवर्कच्या तिप्पट तर टूजी जीएसएमच्या सहापट वाढते. वाय-फाय आणि मोबाइल कंपनीची इंटरनेट सुविधा या दोहोंमधील बदलाची आंतरसक्रियता/पारस्परिकता व्हीओवाय-फायमुळे शक्य होते हे या हँडसेटचं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. घरामध्ये मोबाइल इंटरनेटची रेंज फारशी मिळत नाही अशा ग्राहकांसाठी व्हीओवाय-फाय हा घटक नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

कॅनन कनेक्ट स्टेशन सीएस १००
कॅनन सीएस १०० हे कनेक्ट स्टेशन वेगवेगळ्या डिव्हाइसमधील फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करण्याचं वनस्टॉप सोल्युशन आहे. जवळपास एक टीबीपर्यंत साठवणुकीची क्षमता असणाऱ्या या कनेक्ट स्टेशनमधील फोटो आणि व्हिडीओ वायरलेस पद्धतीने अ‍ॅक्सेस करता येतील. विविध डिव्हाइसशी शेअर करण्याच्या सुविधेबरोबरच यातील फोटो, व्हिडीओ थेट सोशल नेटवर्कवरदेखील पोस्ट करता येतील. दोन वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या कनेक्ट स्टेशनच्या सेटअपचा वापर करून परदेशातील कुटुंबीयांसोबत तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ शेअर करू शकता.

वैशिष्टय़ं :
१. संग्रह – एनएफसी/वाय-फाय सुविधा असलेल्या कॅमेऱ्यामधील डेटाची कोणत्याही वायरलेस पद्धतीने देवाणघेवाण होऊ शकते. एसडी/एसडीएचसी/एसडीएक्ससी/सीएफ ही मेमरी काडर्स बिल्ट इन मेमरी कार्ड स्लॉटच्यामार्फत सीएस १०० मध्ये वापरता येतील. महिना, वर्ष आणि कॅमेऱ्यानुसार फोटो फाइल्सचं वर्गीकरण केलं जातं. १ टीबी इतक्या साठवणूक क्षमतेनुसार सीएस १०० साधारणत: दीड लाख फोटो (एक फोटो ६.६ एमबीचा) आणि ७० तासांचे व्हिडीओज (एक एचडी व्हिडीओ सरासरी ब्रिटेट ३२ एमबीपीएस) साठवता येतील.
२. व्ह्य़ूविंग  – सीएस १०० हे एचडी टीव्हीला जोडले जाऊ शकते. यामुळे मोठय़ा स्क्रीनवर तुम्हाला छायाचित्रं आणि व्हिडीओज पाहण्याचा आनंद घेता येईल.
३. शेअरिंग – कॅमेऱ्यात काढलेले फोटो स्मार्टफोन किंवा टॅबलेटमध्ये बघता येऊ शकतात. कॅनन इमेज गेटवे (सीआयजी-उ्रॅ) ऑनलाइन फोटो अल्बममध्ये कटेंट अपलोड करता येऊ शकतो. तिथून हाच कटेंट सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करता येतो. योग्य त्या कॅननच्याच वाय-फाय प्रिंटरमार्फत फोटो वायरलेस प्रिंट करता येतात.
४. सोपी आणि सोयीची कनेक्टिव्हिटी – एनएफसी (निअर फिल्ड कम्युनिकेशन) सुविधा असणारे आणि २०१५ साली बाजारात आलेले कॅनन कॅमेरे आणि कॅमकॉर्डर्समधील फोटोज आणि व्हिडीओज वायरलेस पद्धतीने सहज ट्रान्स्फर करता येतील. तसेच २०१० व नंतरच्या उपकरणांसाठी यूएसबी कनेक्शनचा स्लॉटदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सीएस १०० ची किंमत रु. २४,२९९/- आहे.