ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. शुक्रवारी ११ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. यासोबत आतापर्यंत करोनाशी लढताना मृत्यूमुखी पावलेल्यांची संख्या १५ वर पोहचली असून शहरात एकूण ६६० जणांना विषाणूची लागण झालेली आहे.

शुक्रवारी पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी ३ रुग्ण हे याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. उर्वरित ७ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडत असल्याचं समोर आलंय तर एका रुग्णाच्या संसर्गाचं कारण समजू शकलेलं नाही. शहरातील ३११ रुग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, ३३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २९३ रुग्णांना स्थानिक प्रशासनाने होम क्वारंटाइन केलेलं असून, अद्याप ६० जणांचा अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.