News Flash

मीरा रोड येथे १२ वर्षांच्या मुलीचा खेळताना गळफास लागल्याने मृत्यू

पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद

प्रतिकात्मक फोटो

लोकसत्ता – वार्ताहर

मीरा रोड भागातल्या सृष्टी परीसरात एका बारा वर्षीय मुलीचा खेळताना गळफास लागून मृत्यू झाला.मीरा रोड येथील सृष्टी परिसरात एका इमारतीचा सुरक्षा रक्षक पत्नी आणि तीन मुलांसह राहात होता. शुक्रवारी हा सुरक्षारक्षक कामानिमित्त तो बाहेर गेला होता. त्याची पत्नी जेवण तयार करत होती. त्याचवेळी या सुरक्षारक्षकाची १२ वर्षांची मुलगी गळ्यात ओढणी घालून सिलेंडरवर उभी राहून खेळत होती.

खेळताना तिची ओढणी खांबाला अडकली आणि तिला ओढणीचा फास लागला. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. खेळता खेळता या मुलीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी या प्रकरणी अप मृत्यूची नोंद केली आहे. अपमृत्यूची नोंद केल्याची माहिती काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:24 pm

Web Title: 12 year old girl accidental death in mira road scj 81
Next Stories
1 हृदयद्रावक! स्वतःच्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून विनाअनुदानित शिक्षकाची आत्महत्त्या
2 .तर पुन्हा टाळेबंदीचे निर्बंध
3 ठणठणीत पोलिसांनाच करोनाची बाधा
Just Now!
X