ठाणे महापालिकेने शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या मोहिमेंतर्गत झालेलया कारवाईमध्ये गेल्या दोन दिवसांत जवळपास १२५ वाढीव बांधकामे तोडण्यात आली आहेत. रस्ता आणि त्यालगत असलेल्या इमारतींमधील वाढीव बांधकामे हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली होती. त्यानुसार या कारवाईमध्ये जवळपास १२५ बांधकामे तोडण्यात आली. उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीतील कॅसल मिल नाका, गोल्डन डाइज नाका या ठिकाणी जवळपास ४५ वाढीव बांधकामे तोडण्यात आली. तसेच मंगळवार सकाळपासून मानपाडा परिसरात वाढीव अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.